शिक्षणानंतर आपल्यापैकी अनेकांना परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेण्याची आणि जॉब घेऊन तिथेच सेटल होण्याची इच्छा असते. मात्र सर्वांचीच ही इच्छा पूर्ण होऊ शकत नाही. त्यात ज्या लोकांनी ही संधी मिळते त्यांना अमेरिका किंवा ऑस्ट्रेलियाला जाऊन जॉब करण्याची इच्छा असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अमेरिकेतील काही टॉप जॉब्सबद्दल सांगणार आहोत जे करताना हजारो डॉलर्स सॅलरी मिळते. चला तर मग जाणून घेऊया.
यातील सर्वात पहिला जॉब म्हणजे सॉफ्टवेअर डेव्हलपर. एका रिपोर्टप्रमाणे अमेरिकेत सॉफ्टवेअर डेव्हलपर्सना सर्वात जास्त सॅलरी मिळते. सॉफ्टवेअर डेव्हलपर्सना वर्षाला सरासरी $120,730 इतकी सॅलरी मिळते.
Information security analyst हा जॉबही अमेरिकेतील सर्वाधिक सॅलरी असलेला जॉब मनाला जातो. या फिल्डमधील प्रोफेशनल्सना वर्षाला $102,600 इतकी सॅलरी मिळते. IT क्षेत्रात दुसऱ्या नंबरचा हा जॉब आहे.
दुसरा जॉब्स म्हणजे मेडिकल आणि हेल्थ सर्व्हिस मॅनेजर. अमेरिकेत सॉफ्टवेअर डेव्हलपर्सना सर्वाधिक सॅलरी मिळते. सॉफ्टवेअर डेव्हलपर्सना वर्षाला सरासरी $101,340 इतकी सॅलरी मिळते.
अमेरिकेत फिझिशिअन असिस्टंटलाही भरघोस सॅलरी मिळते. एका फिझिशिअन असिस्टंटना $121,530 इतकी सॅलरी मिळते. मेडिकल फिल्डमधील हा जॉब सर्वाधिक पगाराचा जॉब आहे.
मेडिकल फिल्डमधील यानंतरचा सर्वाधिक पगार देणारा जॉब म्हणजे फिझिकल थेरेफिस्ट. हा जॉब करताना $95,620 इतका वर्षाला पगार मिळतो. यासाठी योग्य ते शिक्षण घेणं आवश्यक आहे.