Home /News /career /

रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी! लीगल ऑफिसर आणि अनेक पदांसाठी भरती जाहीर, असा करा अर्ज

रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी! लीगल ऑफिसर आणि अनेक पदांसाठी भरती जाहीर, असा करा अर्ज

RBI Recruitment 2022: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) जाहीर केलेल्या रिक्त पदांसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी opportunities.rbi.org.in ला भेट द्या.

    मुंबई, 17 जानेवारी : भारतीय रिझर्व्ह बँकेत (RBI) नोकरी (Job) करण्याची इच्छा असेल, तर सध्या इच्छुक उमेदवारांसाठी एक उत्तम संधी आहे. रिझर्व्ह बँकेत कायदा अधिकारी (Legal Oficer), तसंच अन्य विविध पदांसाठी भरती मोहीम (Recruitment) राबवण्यात येत आहे. यासाठीची अधिसूचना (Notice) रिझर्व्ह बँकेनं जारी केली असून, अर्ज करण्याची प्रक्रिया (Application Process) सुरू झाली आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 4 फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदत देण्यात आली असून, या रिक्त पदांसाठी 6 मार्च 2022 रोजी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेली परीक्षेबाबतची माहिती बारकाईने वाचावी अशी सूचना बँकेनं केली आहे. या रिक्त पदासाठी अर्ज करण्यासाठी, सर्वप्रथम chances.rbi.org.in या रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन होम पेजवरचा डायरेक्ट रिक्रूटमेंट (Direct Recruitment हा पर्याय निवडा. त्यानंतर Panel Year 2021 - ग्रेड 'B' कायदा अधिकारी (Legal Officer) , ग्रेड 'A' टेक्निकल सिव्हिल, टेक्निकल इलेक्ट्रिकल विभागात व्यवस्थापक, ग्रंथालयासाठी सहायक ग्रंथपाल या पदांसाठी, तर ग्रेड 'A' मधील आर्किटेक्ट (Architect) आणि पूर्णवेळ करारावरच्या क्युरेटर (Curator) यासाठीच्या लिंकवर जावं. त्यानंतर Apply Online च्या लिंकवर क्लिक करावं. त्यानंतर विचारलेली सर्व माहिती भरून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी. मग अर्ज पूर्णपणे भरावा. पूर्ण भरलेल्या अर्जाची प्रिंट काढा. Career Tips: नोकरी करताना स्वतःला द्या 'हे' चॅलेंजेस; यशाची वाट होईल सोपी; वाचा कायदा अधिकारी – ग्रेड 'B'- 2 , व्यवस्थापक - (टेक्निकल सिव्हिल) - 6, व्यवस्थापक - टेक्निकल इलेक्ट्रिकल -3, सहाय्यक ग्रंथपाल ग्रेड ‘A’ -1, आर्किटेक्ट ग्रेड ‘A’ – 1, कोलकाता संग्रहालय इथं पूर्णवेळ करारावरील क्युरेटर -1 अशा 14 जागांवर ही भरती होणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) अधिसूचनेनुसार, RBI Recruitment 2022 मध्ये या पदांसाठी अर्ज करणाऱ्या GEN/OBC/EWS गटातल्या उमेदवारांना 600 रुपये तर SC/ST/PwBD गटातील उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावं लागेल.
    First published:

    Tags: Central government, Job alert

    पुढील बातम्या