Home /News /career /

Career Tips: नोकरी करताना स्वतःला द्या 'हे' चॅलेंजेस; यशाची वाट होईल सोपी; वाचा सविस्तर

Career Tips: नोकरी करताना स्वतःला द्या 'हे' चॅलेंजेस; यशाची वाट होईल सोपी; वाचा सविस्तर

जाणून घ्या काही Success टिप्स

जाणून घ्या काही Success टिप्स

हे चॅलेंजेस (Challenges in Career) स्वीकारून तुम्ही पुढे जात राहिले तर तुम्हाला यशस्वी (How to be successful in Career) होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही.

    मुंबई, 16 जानेवारी: करिअरमध्ये समोर जायचं असेल तर सर्वात महत्त्वाचो गोष्ट म्हणजे जिद्द. मेहनत करण्याची क्षमता आणि जिद्द तुमच्यात असेल तर तुम्ही काहीही शक्य करू शकता. म्हणूनच करिअरमध्ये पुढे जाण्याचा मार्ग (Success tips in Career) मोकळा करण्यासाठी नोकरीदरम्यान स्वतःला काही चॅलेंजेस देत राहणं आवश्यक आहे. जर हे चॅलेंजेस (Challenges in Career) स्वीकारून तुम्ही पुढे जात राहिले तर तुम्हाला यशस्वी (How to be successful in Career) होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. आज आम्ही तुम्हाला असे काही चॅलेंजेस सांगणार आहोत जे स्वीकारून तुम्ही यशस्वी (Success Tips) होऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया. करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी रोज नवनवीन आव्हाने (Challenges in Jobs) स्वीकारणे आवश्यक आहे. जर तुम्ही आव्हानांमुळे घाबरून गेलात किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असाल तर तुम्ही तुमच्या करिअरमधील सर्वात मोठी चूक (Common mistakes in Career) करत आहात. तुमच्या करिअरच्या कोणत्या टप्प्यावर तुम्ही उभे आहात आणि तिथून तुम्हाला कोणत्या मार्गावर जायचे आहे हे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. यासह, आपण निश्चितपणे करिअरमध्ये वाढ (How to get Promotion in Job) करण्यास सक्षम असाल. Career Tips: बारावीनंतर लगेच कमवा भरघोस पैसे; 'हे' शॉर्ट टाइम कोर्सेस येतील कामी ध्येय निश्चित करा स्वतःसाठी मोठी ध्येये ठेवा आणि ती साध्य करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही असे केले नाही तर याचा अर्थ तुम्ही जिथे आहात तिथे आनंदी आहात आणि पुढे जाण्याची इच्छा नाही. तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनच्या पलीकडे जाऊन स्वतःसाठी काही उद्दिष्टे ठेवलीत तर बरे होईल शिक्षण घेत राहणं आवश्यक करिअरमध्ये प्रगती साधण्यासाठी शिक्षण आणि अंमलबजावणी या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. दररोज काहीतरी नवीन शिकण्याचे ध्येय ठेवा. यामुळे तुम्ही नवीन पिढी मागे राहणार नाही आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून करिअरमध्ये पुढे जाण्यास सक्षम असाल. गर्दीत गेल्यावर तुमचाही Confidence कमी होतो? चिंता नको. 'या' टिप्स करा फॉलो असुरक्षिततेला स्थान नको काही लोकांना त्यांची नोकरी गमावण्याची भीती असते (Insecurity in Career). ते त्यांच्या व्यवस्थापकाने दिलेल्या आदेशाचे शांतपणे पालन करतात आणि बॉसला हो म्हणत राहतात, जे चुकीचे आहे. करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी असुरक्षितता दूर करणे अत्यंत आवश्यक आहे.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career, Success, Tips

    पुढील बातम्या