• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • RTMNU Recruitment: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर इथे 109 जागांसाठी नोकरीची संधी; 24,000 रुपये पगार

RTMNU Recruitment: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर इथे 109 जागांसाठी नोकरीची संधी; 24,000 रुपये पगार

अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

 • Share this:
  नागपूर, 02 नोव्हेंबर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर (Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University) इथे लवकरच 109 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Nagpur Vidyapeeth Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. सहाय्य्यक प्राध्यापक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2021 असणार आहे. या जागांसाठी भरती सहाय्य्यक प्राध्यापक (Assistant Professor) - एकूण जागा 109 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सहाय्य्यक प्राध्यापक (Assistant Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 55% गुणांसह पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित विषयांत शिक्षण झालं असणं आवश्यक असणार आहे. राष्ट्रीय पात्रता परीक्षा (NET) उमेदवारांनी उत्तीर्ण केली असणं आवश्यक असणार आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असणं आवश्यक आहे. BAMU Recruitment: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद इथे 231 जागांसाठी भरती; लगेच करा अप्लाय इतका मिळणार पगार सहाय्य्यक प्राध्यापक (Assistant Professor) - 24,000/- रुपये प्रतिमहिना काही महत्त्वाच्या सूचना उमेदवाराच्या मागील रेकॉर्डच्या आधारावर निवड केली जाईल. तसंच नोवाद प्रक्रिया कशी घेण्यात यावी याबाबत सर्व अधिकार विद्यापीठाकडे असतील. अर्ज करण्यासाठीचा पत्ता "द कुलसचिव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, जमनालाल बजाज प्रशासकीय इमारत, महात्मा जोतिबा फुले शैक्षणिक परिसर, कॅम्पस चौक ते अंबाझरी टी-पॉइंट मार्ग, नागपूर-440 033 (M.S.), भारत” अर्ज करण्याची शेवटची तारीख - 12 नोव्हेंबर 2021
  JOB TITLE Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University
  या जागांसाठी भरती सहाय्य्यक प्राध्यापक (Assistant Professor) - एकूण जागा 109
  शैक्षणिक पात्रता  उमेदवारांनी 55% गुणांसह पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  इतका मिळणार पगार 24,000/- रुपये प्रतिमहिना
  अर्ज करण्यासाठीचा पत्ता "द कुलसचिव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, जमनालाल बजाज प्रशासकीय इमारत, महात्मा जोतिबा फुले शैक्षणिक परिसर, कॅम्पस चौक ते अंबाझरी टी-पॉइंट मार्ग, नागपूर-440 033 (M.S.), भारत”
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.nagpuruniversity.ac.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published: