मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

खेळाडूंसाठी मोठी बातमी! Railway मध्ये स्पोर्ट्स कोटामधून होणार बंपर भरती; पात्रतेविषयी इथे मिळेल डिटेल्स

खेळाडूंसाठी मोठी बातमी! Railway मध्ये स्पोर्ट्स कोटामधून होणार बंपर भरती; पात्रतेविषयी इथे मिळेल डिटेल्स

भारतीय रेल्वे क्रीडा कोटा  भरती

भारतीय रेल्वे क्रीडा कोटा भरती

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2022 असणार आहे. तर अर्ज सुरु होण्याची तारीख 30 ऑगस्ट 2022 असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 25 ऑगस्ट: भारतीय रेल्वे क्रीडा कोटा (Railway Sports Quota Indian Railway) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Railway Sports Quota Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. गट क या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2022 असणार आहे. तर अर्ज सुरु होण्याची तारीख 30 ऑगस्ट 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

गट क (RRC/ ER/ Sports Quota)

एकूण जागा - 21

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

गट क (RRC/ ER/ Sports Quota) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी नोटिफिकेशनमध्ये नमूद केल्यानुसार खेळांमध्ये खेळाडू म्हणून भाग घेतला असणं आवश्यक आहे.

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.

9वी ते पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंतच शिक्षण फ्री..फ्री..फ्री; 'स्वयं' पोर्टल लाँच

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचं वय हे 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे.

भरती शुल्क

सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस साठी – रु. 500/-

SC/ST/ESM/स्त्रिया/EBC साठी - रु. 250/-

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज सुरु होण्याची तारीख - 30 ऑगस्ट 2022

10वी पास असाल तर सरकारी नोकरीची संधी सोडू नका; DRDOमध्ये 1901 जागांसाठी भरती

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 29 सप्टेंबर 2022

JOB TITLERailway Sports Quota Recruitment 2022
या पदांसाठी भरतीगट क (RRC/ ER/ Sports Quota) एकूण जागा - 21
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव गट क (RRC/ ER/ Sports Quota) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी नोटिफिकेशनमध्ये नमूद केल्यानुसार खेळांमध्ये खेळाडू म्हणून भाग घेतला असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.
वयोमर्यादा 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान
भरती शुल्कसामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस साठी – रु. 500/- SC/ST/ESM/स्त्रिया/EBC साठी - रु. 250/-

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी  https://er.indianrailways.gov.in/index.jsp?lang=0 या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, Indian railway, Job, Job alert, Railway jobs