मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Railway Recruitment 2021: जुनिअर इंजिनिअर आणि टेक्निशियन पदांसाठी भरती; अशा पद्धतीनं करा अप्लाय

Railway Recruitment 2021: जुनिअर इंजिनिअर आणि टेक्निशियन पदांसाठी भरती; अशा पद्धतीनं करा अप्लाय

या पदांसाठी इच्छुक उमेदवार rrc-wr.com या अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून 21 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत अर्ज दाखल करू शकतात.

या पदांसाठी इच्छुक उमेदवार rrc-wr.com या अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून 21 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत अर्ज दाखल करू शकतात.

या पदांसाठी इच्छुक उमेदवार rrc-wr.com या अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून 21 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत अर्ज दाखल करू शकतात.

नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर:  देशात रेल्वे (Railway Recruitment) हे दळणवळणाचं प्रमुख साधन आहे. कारण रेल्वेचं जाळं मोठं आहे. शासकीय नोकरी, त्यातही रेल्वेत नोकरी करण्याचं स्वप्न अनेक सुशिक्षित युवक पाहतात. अशा युवकांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण पश्चिम रेल्वेनं ज्युनिअर इंजिनीअर (Junior Engineer Recruitment in railway) आणि टेक्निशियनसह (Technician Recruitment in railway) विविध पदांच्या भरतीकरिता (Recruitment) प्रक्रिया सुरू केली आहे. या पदांसाठी अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आता केवळ एका दिवसाचा अवधी बाकी आहे. त्यामुळे ज्या इच्छुक उमेदवारांनी अद्याप या पदांसाठी अर्ज केलेला नाही, त्यांनी तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करावी. तसंच, अधिक माहितीसाठी याबाबतचं नोटिफिकेशन (Notification) काळजीपूर्वक वाचावं, असं आवाहन करण्यात आलं आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार rrc-wr.com या अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून 21 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत अर्ज दाखल करू शकतात.

याशिवाय इच्छुक उमेदवार https://www.rrc-wr.com/JE_Tech/Login या डायरेक्ट लिंकच्या माध्यमातूनही या पदांसाठी अर्ज करू शकतात. तसंच या लिंकवर क्लिक करून इच्छुक उमेदवार पदभरती प्रक्रियेचं नोटिफिकेशनदेखील वाचू शकतात. सुमारे 80 पदं या भरतीप्रक्रियेतून भरली जाणार आहेत.

Railway Recruitment 2021 : रिक्त पदांची संख्या (Vacant Post)

- ज्युनिअर इंजिनीअर - 39 पदं

- टेक्निशियन – 24 पदं

- ज्युनिअर स्टेनोग्राफर – 9 पदं

- ज्युनिअर ट्रान्सलेटर – 8 पदं

Railway Recruitment 2021 : शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

ज्युनिअर स्टेनोग्राफर पदासाठी इच्छुक उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून इयत्ती 12 वी उत्तीर्ण असावा. ज्युनिअर इंजिनीअर पदासाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेचा तीन वर्षांचा डिप्लोमा केलेला असावा. टेक्निशियन पदासाठी इच्छुक उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा. तसेच त्याच्याकडे आयटीआयची पदवी असावी.

CDAC Mumbai Recruitment: प्रगत संगणन विकास केंद्र मुंबई इथे 111 जागांसाठी भरती

Railway Recruitment 2021 : वयोमर्यादा (Age Limit)

या पदांसाठी इच्छुक उमेदवारांचं वय 18 ते 42 वर्षांदरम्यान असावं. तसंच वयोमर्यादेत ओबीसी प्रवर्गातल्या उमेदवारांसाठी 3 वर्षं, एससी आणि एसटी प्रवर्गातल्या उमेदवारांसाठी 5 वर्षांची सूट असेल.

Railway Recruitment 2021 : निवड प्रक्रिया (Selection Process)

पात्र उमेदवारांची निवड सीटीबी परीक्षेच्या माध्यमातून केली जाईल. उमेदवारांना याबाबत अधिक माहिती नोटफिकेशनच्या माध्यमातून मिळू शकेल.

Railway Recruitment 2021 : या तारखा महत्त्वाच्या

अर्ज करण्यास सुरुवात – 22 ऑक्टोबर 2021

अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख – 21 नोव्हेंबर 2021

First published:

Tags: Career opportunities, Railway jobs