• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • CDAC Mumbai Recruitment: प्रगत संगणन विकास केंद्र मुंबई इथे 111 जागांसाठी भरती; दीड लाखाच्या वर मिळणार पगार

CDAC Mumbai Recruitment: प्रगत संगणन विकास केंद्र मुंबई इथे 111 जागांसाठी भरती; दीड लाखाच्या वर मिळणार पगार

अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2021 असणार आहे.

 • Share this:
  मुंबई, 20 नोव्हेंबर: प्रगत संगणन विकास केंद्र मुंबई (Center of Development of Advanced Computing) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (CDAC Mumbai Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. प्रकल्प अभियंता आणि प्रकल्प व्यवस्थापक या पदांसाठी ही भरती (CDAC jobs Mumbai 2021) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2021 असणार आहे. या जागांसाठी भरती प्रकल्प अभियंता (Project Engineers ) प्रकल्प व्यवस्थापक (Project Managers) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्रकल्प अभियंता (Project Engineers) - BE/B.Tech किंवा प्रथम श्रेणी MCA उत्तीर्ण असणं आवश्यक. संगणक विज्ञान/संगणक अनुप्रयोग/माहिती तंत्रज्ञान/इलेक्ट्रॉनिक्स यामधील पदवी असणं आवश्यक. इंजिनिअर्सच्या विभागानुसार शिक्षण आणि 0-9 वर्षांचा अनुभव आवश्यक. प्रकल्प व्यवस्थापक (Project Managers) - BE/B.Tech किंवा प्रथम श्रेणी MCA उत्तीर्ण असणं आवश्यक. संगणक विज्ञान/संगणक अनुप्रयोग/माहिती तंत्रज्ञान/इलेक्ट्रॉनिक्स यामधील पदवी असणं आवश्यक. मॅनेजरच्या विभागानुसार शिक्षण आणि 0-5 अनुभव आवश्यक. इतका मिळणार पगार प्रकल्प अभियंता (Project Engineers) - 56.500/- - 1,65,000/- रुपये प्रतिमहिना (विभागानुसार पगार) प्रकल्प व्यवस्थापक (Project Managers) - 48,000/- - 66,000/- रुपये प्रतिमहिना (विभागानुसार पगार) पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना IIM Ahmedabad मध्ये इंटर्नशीपची सुवर्णसंधी ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्याची शेवटची तारीख - 09 डिसेंबर 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.cdac.in/index.aspx?id=ca_AdvtPEPM_03_2021 या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published: