जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / QS University Rankings: जगातील पहिल्या 150 संस्थांमध्ये भारताच्या 'या' शैक्षणिक संस्थेचं नाव; पहा टॉप-10 लिस्ट

QS University Rankings: जगातील पहिल्या 150 संस्थांमध्ये भारताच्या 'या' शैक्षणिक संस्थेचं नाव; पहा टॉप-10 लिस्ट

पहिल्या 150 संस्थांमध्ये भारताच्या 'या' शैक्षणिक संस्थेचं नाव

पहिल्या 150 संस्थांमध्ये भारताच्या 'या' शैक्षणिक संस्थेचं नाव

या क्रमवारीत एका भारतीय संस्थेने जगातील पहिल्या 150 विद्यापीठांमध्येही स्थान मिळवलं आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 27 जून : जगभरातील विद्यापीठांना क्रमवारी देणारी QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2024 प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये जगभरातील संस्थांचे विविध स्केलवर मूल्यमापन केल्यानंतर त्याला गुण दिले जातात. या गुणांच्या आधारे क्रमवारी तयार केली जाते. नुकतीच क्रमवारी मंगळवारी प्रसिद्ध झाली असून, या क्रमवारीत एका भारतीय संस्थेने जगातील पहिल्या 150 विद्यापीठांमध्येही स्थान मिळवलं आहे. त्यामुळे संपूर्ण भारताची मान उंचावली आहे. आज आम्ही तुम्हाला ही संस्था कोणती आहे आणि या यादीत भारतातील इतर कोणत्या संस्था आहेत याबद्दल तुम्हा माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. ही संस्था आयआयटी बॉम्बे आहे. या क्रमवारीत आयआयटी बॉम्बेला 149 वं स्थान मिळवलं आहे. यानंतर दुसरी भारतीय संस्था आयआयटी दिल्ली आहे, जिला 197 वा क्रमांक देण्यात आला आहे. MahaTransco Recruitment 2023: अजून एक मेगाभरती! राज्याच्या वीज पारेषण विभागात 3129 पदांसाठी ओपनिंग्स; इथे करा अर्ज गेल्या 8 वर्षात पहिल्यांदाच एखाद्या भारतीय संस्थेने टॉप 150 मध्ये स्थान मिळवलं आहे. यापूर्वी 2016 मध्ये IISC बंगळुरूला 147 वा क्रमांक मिळाला होता. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत IISc बंगळुरूच्या क्रमवारीत लक्षणीय घट झाली आहे. गेल्या वर्षी संस्थेचे मानांकन 155 होते, तर यावर्षी ते 225 व्या क्रमांकावर आहे. टॉप 500 संस्थांमध्ये 11भारतीय संस्था 11 भारतीय संस्थांनी जगातील टॉप 500 संस्थांमध्ये स्थान मिळवले आहे. त्यानंतर IIT बॉम्बे, IIT दिल्ली, IISc बंगलोर 271व्या, IIT कानपूर 278व्या, IIT कानपूर 285व्या, IIT गुवाहाटी 364व्या, IIT रुरकी 369व्या, दिल्ली विद्यापीठ 407व्या आणि अण्णा विद्यापीठ 427व्या क्रमांकावर आहे. Maharashtra Talathi Bharti: ‘या’ पुस्तकांमधून करा तलाठी परीक्षेचा अभ्यास; तुम्हालाच मिळेल सरकारी नोकरी भारतातील टॉप-10 संस्थांची क्रमवारी

रँक संस्था
149IIT बॉम्बे
197IIT  दिल्ली
225IISC
271IIT  खड़गपुर
278IIT कानपुर
285IIT मद्रास
364IIT गुवाहाटी
369IIT  रुड़की
407Delhi University
427Anna University

Railway Recruitment: 10वी पास उमेदवारांच्या तब्बल 3624 जागांसाठी बंपर ओपनिंग्स; या लिंकवर आज सुरु झाली अर्ज प्रक्रिया शिक्षण आणि त्या देशातील लोकनसंख्या या गोष्टीवरही शिक्षण पद्धती अवलंबून असते. त्यामुळे जरी पहिल्या दिडशे संस्थांमधून फक्त एकच संस्था भारताची असेल तरी भारतातील शिक्षण पद्धतीही इतर देशांच्या तुलनेत प्रगल्भ आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात