जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / मोठी बातमी! राज्यातील तासिका तत्वावर शिकवणाऱ्या प्राध्यापकांना मोठा दिलासा; मानधनात होणार वाढ; उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

मोठी बातमी! राज्यातील तासिका तत्वावर शिकवणाऱ्या प्राध्यापकांना मोठा दिलासा; मानधनात होणार वाढ; उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

तासिका तत्त्वावर शिकवणाऱ्या प्राध्यापकांचं मानधन विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) निकषानुसार वाढवण्याचा निर्णय झाला." अशी माहिती अजित पवार यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 07 जून: गेल्या कित्येक दिवसांपासून राज्यातील महाविद्यालयांमध्ये शिकवणाऱ्या तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या मानधनाचा (CHB professors salary) प्रश्न रखडला होता. तसंच राज्यातील काही मोठ्या कॉलेजेसमध्ये प्राध्यापकांच्या भरतीचा (Professors recruitment 2022) प्रश्नही रखडला होता. मात्र आता यावर तोडगा काढत अशा महाविलद्यालयातील प्राध्यापकांसाठी आणि तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांसाठी मोठा निर्णय (CHB professors salary will increased) घेण्यात आला आहे. तशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विटरवरून केली आहे. “वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांची भरती प्रक्रिया व तासिका तत्त्वावर (सीएचबी) कार्यरत प्राध्यापकांच्या दरमहा मानधनाबाबत बैठक झाली. राज्यातील महाविद्यालयातून तासिका तत्त्वावर शिकवणाऱ्या प्राध्यापकांचं मानधन विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) निकषानुसार वाढवण्याचा निर्णय झाला.” अशी माहिती अजित पवार यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. तसंच अजित पवारांनी विद्यापीठांचं आकृतीबंध तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. ‘नॅक’ (राष्ट्रीय मूल्यांकन तथा प्रत्यायन परिषद) मानांकन असणाऱ्या महाविद्यालयांना 50 टक्के पद भरतीला परवानगी दिली जावी, गुणवत्तापूर्ण शिक्षणात कोणतीही तडजोड करु नये, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्यात लवकरच प्राध्यापकांची भरती होणार आहे अशीही माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

जाहिरात

“राज्यातील महाविद्यालयातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी तसंच महाविद्यालयातून गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं, यासाठी विशेष प्रयत्न करावेत अशाही सूचना अजित पवार यांनी दिल्या आहेत. या निर्णयाचा फायदा राज्यातील हजारो ‘सीएचबी’ तत्त्वावर शिकवणाऱ्या प्राध्यापकांना होणार आहे असा विश्वास ऐट पवारांनी व्यक्त केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात