मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

क्या बात है! राज्यातील शाळांचा चेहरामोहरा बदलणार? लागू होऊ शकतं दिल्ली स्कुल मॉडेल; वाचा डिटेल्स

क्या बात है! राज्यातील शाळांचा चेहरामोहरा बदलणार? लागू होऊ शकतं दिल्ली स्कुल मॉडेल; वाचा डिटेल्स

आता महाराष्ट्रातही दिल्ली स्कुल मॉडेल लागू होणार का अशी चर्चा सुरु झाली आहे.

आता महाराष्ट्रातही दिल्ली स्कुल मॉडेल लागू होणार का अशी चर्चा सुरु झाली आहे.

आता महाराष्ट्रातही दिल्ली स्कुल मॉडेल लागू होणार का अशी चर्चा सुरु झाली आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

नवी दिली, 27 ऑक्टोबर: कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळा सुरु (Schools Reopen in Maharashtra) करण्यात आल्या. बदलत्या काळानुसार शाळांना आता डिजिटल करण्याची (Digital School) आणि विद्यार्थ्यांना विशेष पद्धतीनं शिक्षण देण्याची गरज भासू लागली आहे. त्यामुळे शिक्षण पद्धतींमध्ये बदल करण्याची गरज आहे. दिल्ली सरकारनं (Government of Delhi) यावर पावलं उचलत विद्यार्थ्यांना शाळांमध्ये योग्य त्या सुविधा पुरवल्या आहेत आणि अनेक विद्यार्थी आणि शिक्षण क्षेत्रातही तज्ज्ञ या कामगिरीवर समाधानी आहेत. त्यामुळे दिल्लीतील शाळांमध्ये असलेलं शिक्षणाचं मॉडेल (Education Model in Delhi Schools) हे राज्यातही लागू होण्याची शक्यता दिसतेय. आज मंत्री संजय बनसोडे (Minister Sanjay Bansode) यांनी दिल्लीतील दोन शाळांना भेट दिली आणि शिक्षणपद्धती समजून घेतली. त्यामुळे आता महाराष्ट्रातही दिल्ली स्कुल मॉडेल लागू होणार का अशी चर्चा सुरु झाली आहे.

राष्ट्रीय राजधानीतील शिक्षणाचे मॉडेल समजून घेण्यासाठी महाराष्ट्राचे मंत्री संजय बनसोडे यांनी मंगळवारी दिल्लीतील दोन सरकारी शाळांना भेट दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मंत्री यांनी कौटिल्य राजकिया सर्वोदय बाल विद्यालय, चिराग एन्क्लेव्ह, ग्रेटर कैलाश आणि स्कूल ऑफ एक्सलन्स, कालकाजीला भेट दिली.

तुमची शालेय कागदपत्र हरवली? या लिंकवर मिळेल Duplicate Marksheet

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंत्री संजय बनसोडे यांना दिल्लीतील सरकारी शाळांना भेट देण्यास सांगितलं. दिल्लीच्या शैक्षणिक मॉडेलपासून भरपूर शिकण्यासारखं आहे आणि दिल्लीप्रमाणे महाराष्ट्रातही सरकारी शाळा तयार व्हाव्या यासाठी शरद पवारांनी सांगितलं आहे, असं दिल्ली सरकारनं दिलेल्या निवेदनात म्हंटलं आहे.

दिल्ली सरकार महाराष्ट्राला करणार मदत

शालेय दौऱ्यात मंत्री संजय बनसोडे हे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासोबत होते. यावेळी मनीष सिसोदिया म्हणाले की, सार्वजनिक शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी दिल्ली सरकार महाराष्ट्र सरकारला मदत करण्यास तयार आहे. दिल्ली सरकारच्या अधिकार्‍यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मंत्र्याला दिल्ली सरकारने सुरू केलेल्या देशभक्तीच्या अभ्यासक्रमाची देखील माहिती देण्यात आली आहे.

First published: