केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डने (CBSE) डुप्लिकेट अकॅडेमिक डॉक्युमेंट सिस्टम (Duplicate Academic Document System) अर्थात DADS ची सुरुवात केली आहे. या प्लॅटफॉर्मवरुन तुम्ही तुमचे डुप्लिकेट शैक्षणिक डॉक्युमेंट्स मिळवू शकता.
आतापर्यंत विद्यार्थ्यांना रिजनल ऑफिसमध्ये जाऊन एक फॉर्म भरुन, फी जमा करुन अर्ज करावा लागत होता. परंतु आता या नव्या सिस्टममुळे विद्यार्थ्यांना त्रास न होता, ही प्रक्रिया सोपी होणार आहे. हे सर्व काम घरबसल्या ऑनलाईन केलं जाऊ शकेल.
CBSE चं नवं Duplicate Academic Document System अर्थात DADS प्लॅटफॉर्म विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.
या प्लॅटफॉर्मवरुन घरबसल्या ऑनलाईन डुप्लिकेट मार्कशिट, पासिंग सर्टिफिकेट आणि मायग्रेशन सर्टिफिकेट मिळवता येईल.
या सुविधेचा फायदा घेण्यासाठी सीबीएसईच्या https://cbseit.in/cbse/web/dads/home.aspx या लिंकवर जावं लागेल.
इथे अप्लाय करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. अॅप्लिकेशन मिळाल्यानंतर रिजनल ऑफिस डुप्लिकेट पेपर प्रिंट करतील आणि स्पीड पोस्टद्वारे विद्यार्थ्यांना पाठवतील. हे डॉक्युमेंट ट्रॅकही करता येऊ शकतं.