मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

'तिनं' वडिलांच्या खांद्यावर बघितला होता आईचा मृतदेह; तरीही सोडली नाही जिद्द; करून दाखवलं 'हे' काम

'तिनं' वडिलांच्या खांद्यावर बघितला होता आईचा मृतदेह; तरीही सोडली नाही जिद्द; करून दाखवलं 'हे' काम

या मुलीची कहाणी आणि तिचा संघर्ष वाचून तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

या मुलीची कहाणी आणि तिचा संघर्ष वाचून तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

या मुलीची कहाणी आणि तिचा संघर्ष वाचून तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

  • Published by:  Atharva Mahankal

भुवनेश्वर (ओडिशा), 28 जून: कठीण परिस्थितीमध्ये जिद्दीनं शिकून स्वतःची ओळख निर्माण केलेल्या विद्यार्थ्यांची कहाणी (Positive stories of students) आपण नेहमीच ऐकत आणि बघत असतो. मात्र भुवनेश्वरच्या (Bhubaneswar) चांदनी माझी (Chandni Mazi) या मुलीची कहाणी आणि तिचा संघर्ष वाचून तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

भुवनेश्वर जिल्ह्यातील थुआमुल-रामपूर मंडळाच्या मेलाघर गावातील दाना माझी या व्यक्तीच्या पत्नीचा मृत्यू झाला होता. मात्र त्यावेळी अंत्यसंस्काराला (Last rites) मृतदेह नेण्यासाठी काहीही सोयी-सुविधा नव्हत्या. त्यामुळे दाना माझी यांनी आपल्या पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन तब्बल दहा किलोमीटर यानंतर गाठलं होतं. त्यावेळी चांदनीनं आपल्या आईचा मृतदेह घेऊन वडिलांसोबत दहा किलोमीटरची पायपीट केली होती.

हे वाचा - Study in Abroad: परदेशात शिक्षणासाठी 'हे' आहेत टॉप 4 देश; Visa मिळणार लगेच

परिस्थिती वाईट होती मात्र शिक्षणाची जीद्द चांदनीच्या मनात होती. 2016 मध्ये पत्नीच्या पार्थिवावर 10 किमी चालली होती. त्यादरम्यान चांदनी देखील वडिलांसोबत होती. त्यामुळे  संघर्ष तिनं जवळून बघितला होता. ही घटना उघडकीस आल्यानंतर केआयएसएसचे (KISS) संस्थापक डॉ. ए. सामंत यांनी माझीच्या गरिबीचा विचार करून त्यांच्या तीन मुलींना शाळेत दाखल केलं. यावर चांदनीनं सामंत यांचे आभार मानले होते.

यानंतर आता दहावीची परीक्षा (10th Exams) देत चांदनीनं जिद्दीनं उत्तम गुण मिळवले आहेत. आई-वडिलांच्या संघर्षाकडे बघून चांदनीनं हे गुण मिळवले आहेत. तिला 600 पैकी 280 गुण मिळाले आहेत. पाचवीला पुजलेल्या गरिबीतूनही चांदनी जिद्द न सोडता परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. तिच्याप्रमाणेच तिच्या दोनही बहिणी आता शिक्षण घेत आहेत.

First published:

Tags: Odisha, Positive story, Success story