Home /News /career /

राज्यातील तरुणांसाठी नोकरीची बंपर लॉटरी; राज्याच्या पोलीस विभागात तब्बल 7231 जागांसाठी मेगाभरती

राज्यातील तरुणांसाठी नोकरीची बंपर लॉटरी; राज्याच्या पोलीस विभागात तब्बल 7231 जागांसाठी मेगाभरती

राज्यात तब्बल 7231 पोलीस शिपाई भरती

राज्यात तब्बल 7231 पोलीस शिपाई भरती

या भरतीसाठी सुरवातीला परीक्षा घेतली जाणार आहे. यामध्ये आधी शारीरिक चाचणी आणि त्यांनतर लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.

  मुंबई, 28 जून: राज्यात प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. मात्र या सर्व राजकीय गदारोळातही राज्य सरकारकडून तरुणांसाठी आणि पोलीस होण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. राज्यात तब्बल 7231 पोलीस शिपायांची भरती होणार आहे असं GR काढण्यात आलं आहे. त्यामुळेराज्यातील बेरोजगार तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे. शासनाने महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवाप्रवेश नियमामध्ये सुधारणा केली असून पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे अशी माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. या भरतीसाठी सुरवातीला परीक्षा घेतली जाणार आहे. यामध्ये आधी शारीरिक चाचणी आणि त्यांनतर लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. रांगड्या गड्यांनो, पोलीस होण्यासाठी आता द्या 'मैदानी' परीक्षा; भरतीसाठी सरकारकडून नियमांमध्ये मोठा बदल कशी होणार शारीरिक चाचणी पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणी एकूण 50 गुणांची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 1600 मीटर धावणे (20 गुण), 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण असणार आहेत. तर महिला उमेदवार यांच्यासाठी 800 मीटर धावणे (20 गुण). 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण असणार आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरूष) पदासाठीशारीरिक चाचणी एकूण 100 गुणांची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 5 कि.मी. धावणे (50 गुण), 100 मीटर धावणे (25 गुण), गोळाफेक (25 गुण) असे एकूण 100 गुण असणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे शारीरिक चाचणीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार पदानुसार 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी पात्र असणार आहेत. यानंतर उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. अशी असेल लेखी परीक्षा लेखी चाचणीमध्ये अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुध्दीमत्ता चाचणी मराठी व्याकरण या विषयावर आधारीत प्रश्न असतील. लेखी चाचणी मध्ये विचारण्यात येणारे प्रश्न बहुपर्यायी प्रकारचे असतील. परीक्षामराठी भाषेत घेण्यात येईल. तसेच या लेखी चाचणीचा कालावधी 90 मिनिटे असेल. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40 टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये 40 टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील. तसंच पोलीस भरतीमधील लेखी परिक्षा विशेष बाब म्हणून OMR (Optical Mark Recognition) पध्दतीने घेण्याबाबत शासनाने मान्यता दिली आहे. नोकरीची ही संधी घालवणं परवडणार नाही; NABCONS मध्ये ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी Job
  त्यामुळे हा राज्यातील तरुणांसाठी मोठा दिलासा आहे. गृह विभागाकडून यासंबंधीची सविस्तर अधिसुचना जाती करण्यात येणार आहे. तसंच या भरतीसाठी अप्लाय कसं करणार याबाबत सविस्तर माहिती पुरवली जाणार आहे.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career, Job, Job alert, Maharashtra police

  पुढील बातम्या