Home /News /career /

रांगड्या गड्यांनो, पोलीस होण्यासाठी आता द्या 'मैदानी' परीक्षा; भरतीसाठी सरकारकडून नियमांमध्ये मोठा बदल

रांगड्या गड्यांनो, पोलीस होण्यासाठी आता द्या 'मैदानी' परीक्षा; भरतीसाठी सरकारकडून नियमांमध्ये मोठा बदल

भरतीच्या नियमांमध्ये मोठा बदल

भरतीच्या नियमांमध्ये मोठा बदल

पोलीस होण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या उमेदवारांसाठी राज्य सरकारकडून ही मोठी घोषणा करण्यात आली आहे. मात्र यासाठी राज्य सरकारतर्फे भरतीच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे.

    मुंबई, 28 जून: आज राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात वर्ष 2020 पासून रखडलेल्या पोलीस भरतीला अखेर मान्यता मिळाली आहे. राज्यात लवकरच तब्बल 7231 पोलीस शिपायांची भरती होणार आहे असं GR काढण्यात आलं आहे. त्यामुळेराज्यातील बेरोजगार तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे. तरुणांसाठी आणि पोलीस होण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या उमेदवारांसाठी राज्य सरकारकडून ही मोठी घोषणा करण्यात आली आहे. मात्र यासाठी राज्य सरकारतर्फे भरतीच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. शासनाने महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवाप्रवेश नियमामध्ये सुधारणा केली असून पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे अशी माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. या भरतीसाठी सुरवातीला परीक्षा घेतली जाणार आहे. यामध्ये आधी शारीरिक चाचणी आणि त्यांनतर लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. राज्यातील तरुणांसाठी नोकरीची बंपर लॉटरी; राज्याच्या पोलीस विभागात तब्बल 7231 जागांसाठी मेगाभरती म्हणजेच आतापर्यंत होणार परीक्षा ही लेखी आणि आऊटर प्रकारची होत होती. मात्र आता पहिल्यांदाच मैदानी चाचणी घेतली जाणार आहे. त्यामुळे राज्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही याचा मोठा लाभ होणार आहे असं गृह मंत्र्यांकडून संगणयत आलं आहे. मात्र हा नियम नक्की होता तरी काय हे जाणून घेणं आवश्यक आहे. आतापर्यंत या नियमांमध्ये तब्बल तीन वेळा बदल करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील तरुणांना पोलिस भरतीत संधी मिळावी म्हणून तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पहिल्यांदा लेखीऐवजी मैदानी चाचणी घेण्याचा निर्णय घेतला होता. पुन्हा त्यात बदल करून पहिल्यांदा लेखी चाचणी घेण्याचा निर्णय झाला होता. मात्र आता महाविकास आघाडी सरकारने भरती पध्दतीत बदल करून सर्वप्रथम मैदानी चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रांगड्या गड्यांनाही पोलीस भरतीत आपलं नशीब आजमावता येणार आहे आणि पोलीस होता येणार आहे. नोकरीची ही संधी घालवणं परवडणार नाही; NABCONS मध्ये ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी Job या नव्या दुरुस्तीचा लाभ पोलिस दलास होणार असून, त्यांना ताकदवान मनुष्यबळ उपलब्ध होईल. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या बदलाचा मोठा फायदा होईल असा विश्वास गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला आहे.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Jobs Exams, Maharashtra police, Mumbai police

    पुढील बातम्या