नवी दिल्ली, 22 मे : देशातील विविध उच्च शिक्षण (Higher Education)देणाऱ्या संस्थांमधील गुणवत्तापूर्ण संशोधनाला (Research) चालना देण्याच्या उद्देशानं पंतप्रधान रिसर्च फेलो (पीएमआरएफ-PMRF) योजना राबवली जाते. ही देशातील सर्वाधिक फेलोशिप (Fellowship)मिळणारी योजना आहे. सर्व आयआयटी(IIT),आयआयएसईआर (IISER),प्रमुख केंद्रीय विद्यापीठ (Central Universities)आणि विज्ञान किंवा तंत्रज्ञानाची पदवी प्रदान करणाऱ्या एनआयटी (NIT)संस्थांमध्ये ही योजना राबवली जाते. निवड होण्यासाठी काय करावे? या फेलोशिपसाठी (Fellowship)इच्छुक विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष सुरू होताच थेट (Direct)किंवा लॅटरल एन्ट्री (Lateral Entry)पद्धतीनं अर्ज करणं आवश्यक आहे. पात्र उमेदवारांना ही फेलोशिप योजना राबवल्या जाणाऱ्या शैक्षणिक संस्थेत पीएचडीसाठी (PhD) प्रवेश घेणे आवश्यक आहे. निवड झाली तर संस्था त्या उमेदवाराला उमेदवारी देईल; परंतु या फेलोशिपसाठी निवड होण्याची हमी देत नाही. या योजनेसाठी लॅटरल एन्ट्री पद्धतीनं अर्ज करण्यासाठी पदव्युत्तर पदवी (Master Degree) घेतलेल्या उमेदवारांनी पीएचडीसाठी 12 महिन्यांच्या पात्र होणं अपेक्षित आहे. पदवीधार अर्जदारांसाठी हा कालावधी 24 महिन्यांचा आहे. थेट प्रवेशामध्ये, एमटेक पूर्ण केलेले किंवा पीएचडी घेतलेले उमेदवार त्यांच्या संशोधन प्रकल्पांसाठी या फेलोशिपसाठी अर्ज करू शकतात. विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित विषयात पदवी घेतलेले उमेदवारदेखील यासाठी अर्ज करू शकतात, मात्र अर्जदारांकडे किमान 8 सीजीपीए (CGPA)असणे आवश्यक आहे. ज्यांना पदवी परीक्षेत पात्रतेसाठी आवश्यक गुण मिळालेले नाहीत ते गेट परीक्षा (GATE) देऊन त्याद्वारे अर्ज करू शकतात. उमेदवारांची निवड करण्यासाठी नेमण्यात आलेली तज्ज्ञांची शिखर समिती अंतिम निर्णय घेईल. हे ही वाचा- MCGM Recruitment 2021: पॅरामेडिकल पदांसाठी बंपर भरती सुरू, पाहा कसा कराल अर्ज अर्ज करण्याची प्रक्रिया : ही रोलिंग योजना असल्याने याला ठराविक अशी अंतिम मुदत नसते; मात्र उमेदवारांनी पीएचडीसाठी अर्ज करण्याकरता असलेल्या अंतिम मुदतीबाबत लक्ष ठेवणं आवश्यक आहे. संशोधन कोठे करता येईल? देशभरातील38नामांकित शिक्षण संस्थांमध्ये ही योजना उपलब्ध आहे. यामध्ये अलिगढ मुस्लिम विद्यापीठ, कोलकाता, पुणे, भोपाळ आणि बेरहमपूर इथं असलेल्या आयआयएसआर संस्था, बनारस हिंदू विद्यापीठ, आयआयएससी बंगलोर, आयआयटी (आयएसएम) धनबाद, दिल्ली विद्यापीठ, हैदराबाद विद्यापीठ, जामिया मिलिया इस्लामिया, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ यांच्यासह विविध आयआयटी संस्थांचा समावेश आहे. अर्ज करण्याच्या पात्रता आणि प्रक्रियेसंदर्भात अधिक माहितीसाठी उमेदवार पीएमआरएफच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. स्टायपेंड : निवड झालेल्या उमेदवारांना पहिल्या दोन वर्षात दरमहा 70 हजार रुपये, तिसऱ्या वर्षासाठी 75 हजार रुपये त्यानंतर चौथ्या आणि पाचव्या वर्षी दरमहा 80 हजार रुपये स्टायपेंड (Stipend) दिला जातो. याव्यतिरिक्त, संशोधनासाठी शैक्षणिक आणि प्रवास खर्च म्हणून 5 वर्षांसाठी दरवर्षी 2 लाख रुपयांचे संशोधन अनुदानदेखील दिले जाते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.