मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

क्या बात है! Paytm देणार तब्बल 20 हजार अंडर ग्रॅज्युएट्सना नोकरी; सॅलरी बघून व्हाल थक्क

क्या बात है! Paytm देणार तब्बल 20 हजार अंडर ग्रॅज्युएट्सना नोकरी; सॅलरी बघून व्हाल थक्क

आता पेटीएममध्ये तब्बल 20 हजार तरुणांसाठी (Paytm jobs 2021) पदभरती होणार आहे.

आता पेटीएममध्ये तब्बल 20 हजार तरुणांसाठी (Paytm jobs 2021) पदभरती होणार आहे.

आता पेटीएममध्ये तब्बल 20 हजार तरुणांसाठी (Paytm jobs 2021) पदभरती होणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

नवी दिल्ली, २८ जुलै: नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठी डिजिटल पेमेंट सोल्यूशन कंपनी (Digital payment Solution Company) पेटीएम (Paytm jobs) दिवाळीपूर्वी तब्बल 16,600 कोटी रुपयांचा आयपीओ (IPO)आणणार आहे. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ असल्याचं मानलं जात आहे. आयपीओ आणण्यापूर्वी कंपनी पूर्णपणे तयारी करत आहे. यासाठी पेटीएम आता आपल्या कर्मचार्‍यांची संख्या वाढवण्यावर विचार करत आहे. त्यानुसार आता पेटीएममध्ये तब्बल 20 हजार तरुणांसाठी (Paytm jobs 2021) पदभरती होणार आहे.

या पदासाठी होणार भरती

Paytm 20,000 फील्ड सेल्स एक्झिक्युटिव्हची (field sales executives ) नेमणूक करण्याच्या विचारात आहे. फील्ड सेल्स एक्झिक्युटिव्ह व्यापारी आणि यूजर्सना डिजिटल सेवांचं शिक्षण देतील आणि कंपनीच्या विविध डिजिटल उत्पादनांचा प्रचार करतील. त्यामुळे यासाठी टेक्नॉलॉजी समजणाऱ्या तरुणांची गरज असणार आहे.

हे वाचा -  Western Railway Recruitment: पश्चिम रेल्वे मुंबई इथे मोठी पदभरती; इथे करा अर्ज

दहावी बारावी उत्तीर्ण करू शकतात अर्ज

जे उमेदवार 18 वर्ष वयाचे आहेत आणि 10 वी, 12 वी किंवा पदवीधर आहेत अशे उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. इच्छुक व्यक्ती अँड्रॉइड स्मार्टफोनमधून पेटीएम अ‍ॅप वापरुन अर्ज करू शकतात. दुचाकी वाहन असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिलं जाणार आहे, ज्यांना प्रवास करण्यास सोयीस्कर आहे आणि विक्रीचा आधीचा अनुभव आहे. अर्जदारांना स्थानिक भाषा आणि प्रदेशाचं देखील चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार

निवड करण्यात आलेल्या फील्ड सेल्स एक्झिक्युटिव्ह (field sales executives) यांना दरमहा 35,000 रुपये पगार असणार आहे. पेटीएमने पदवीधरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी आपला फील्ड सेल्स एक्झिक्युटिव्ह (एफएसई) कार्यक्रम सुरू केला आहे. यानुसार  ही भरती लवकरच होणार आहे.

First published:

Tags: Career, Jobs, Paytm