नवी दिल्ली, 01 एप्रिल : ‘परीक्षा पे चर्चा’ (Pariksha pe Charcha 2022) दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. बोर्डाची परीक्षा देणाऱ्या आणि इतर विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणखी वाढवण्याच्या दृष्टीनं शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय (Education Ministry) गेल्या चार वर्षांपासून याचे आयोजन करत आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरातील विद्यार्थी या कार्यक्रमाला प्रचंड मोठा प्रतिसाद देतात. यंदा हा कार्यक्रम आज म्हणजेच 1 एप्रिल रोजी नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर आयोजित केला जाणार आहे. देशभरातीललाखो विद्यार्थी आणि पालक हा कार्यक्रम बघू शकणार आहेत. पण हा कार्यक्रम कधी आणि कसा बघावा याबद्दलची संपूर्ण माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. कार्यक्रमासाठी अशी झाली विद्यार्थ्यांची निवड या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना काही स्पर्धांमध्ये भाग घ्यावा लागला. 15 लाखांहून अधिक नोंदणी झाली. या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे दोन हजारांची निवड करण्यात आली आहे. या दोन हजार विद्यार्थ्यांपैकी शिक्षक आणि पालक 1000 जणांना PPC 2022 मध्ये सहभागी होण्यासाठी बोलावले जात आहे. यातील काही विद्यार्थी कमी आत्मविश्वास असणारे आहेत, काही मध्यम वर्गीय कुटुंबातील आहेत तर काही शिक्षक आहेत अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली आहे. परीक्षा पे चर्चा 2022: पंतप्रधान मोदींनी केलं विद्यार्थ्यांच कौतुक; म्हणाले…
यंदाच्या कार्यक्रमात काय खास
केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणाले की PPC 2022 हा केवळ भारतातील तरुणांनाच नव्हे तर सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेला एक अभिनव उपक्रम आहे. विद्यार्थ्यांच्या मनातील ताण कमी करणे हा यामागचा उद्देश आहे. विद्यार्थ्यांचा ताण-तणाव कमी करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने अनेक प्रयोग केले आहेत. परीक्षा पद्धतीत बदल, अभ्यासक्रमात कपात. यावेळी शिक्षकांना लॉकडाऊन दरम्यान व्हर्च्युअल पद्धतीने शिकवण्याचे त्यांचे अनुभव शेअर करण्याची संधीही दिली जाणार आहे. परिक्षा पे चर्चा 2022 मध्ये समाविष्ट झालेल्या दोन हजार सहभागींना NCERT कडून प्रमाणपत्र मिळेल. कोविडचे नियम लक्षात घेऊन तालकटोरा स्टेडियमवर होणाऱ्या चर्चेत सहभागी होण्यासाठी फक्त एक हजार विद्यार्थ्यांना आमंत्रित केले जाईल. यावेळी लाइव्ह स्ट्रीमिंगही गव्हर्नर हाऊसमध्ये करण्यात येणार आहे. शिक्षणमंत्र्यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून काही विद्यार्थ्यांना गव्हर्नर हाऊसमध्ये बोलावून त्यांच्यासोबत लाइव्ह स्ट्रीमिंग पाहण्यास सांगितले. आहे.भारतातील प्रत्येक शैक्षणिक संस्थेत याचे थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे.