जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / परीक्षा पे चर्चा 2022: पंतप्रधान मोदींनी केलं विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचं कौतुक; म्हणाले...

परीक्षा पे चर्चा 2022: पंतप्रधान मोदींनी केलं विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचं कौतुक; म्हणाले...

परीक्षा पे चर्चा 2022: पंतप्रधान मोदींनी केलं विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचं कौतुक; म्हणाले...

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या उत्साहाचं कौतुक केलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 30 मार्च: पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 एप्रिल रोजी ‘परीक्षा पे चर्चा’ (PPC) दरम्यान विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधणार आहे. हा कार्यक्रम 1 एप्रिल रोजी नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर आयोजित केला जाणार आहे. ‘परीक्षा पे चर्चा’ (Pariksha pe Charcha 2022) दरम्यान पंतप्रधान विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय (Education Ministry) गेल्या चार वर्षांपासून याचे आयोजन करत आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरातील विद्यार्थी या कार्यक्रमाला प्रचंड मोठा प्रतिसाद देतात. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या उत्साहाचं कौतुक केलं आहे. 16 फेब्रुवारी 2018 रोजी येथील तालकटोरा स्टेडियमवर शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी पंतप्रधानांच्या संवाद कार्यक्रमाची पहिली आवृत्ती आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर, PPC ची दुसरी आणि तिसरी आवृत्ती नवी दिल्ली येथे परस्पर ‘टाउन-हॉल’ स्वरूपात आयोजित करण्यात आली. तर चौथी आवृत्ती गेल्या वर्षी ७ एप्रिल रोजी ऑनलाइन झाली होती. त्याचवेळी, यावर्षी ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाची पाचवी आवृत्ती तालकटोरा स्टेडियमवर 1 एप्रिल रोजी आयोजित केली जाणार आहे. यावर्षीच्या ‘परिक्षा पे चर्चा’ मध्ये ज्या विद्यार्थ्यांना आपलं रजिस्ट्रेशन केलं आहे. अशा विद्यार्थ्यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे आणि कौतुक केलं आहे.तसंच परिक्षा पे चर्चामध्ये योगदान देणाऱ्या विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचेही त्यांनी आभार मानले आहेत. एका ट्विटच्या माध्यमातून पंतप्रधानांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

जाहिरात

ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले; “यंदाच्या परिक्षा पे चर्चासाठीचा उत्साह अभूतपूर्व आहे. लाखो लोकांनी त्यांचे मौल्यवान अंतर्दृष्टी आणि अनुभव शेअर केले आहेत. मी त्या सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचे आभार मानतो ज्यांनी योगदान दिले आहे. 1 एप्रिलच्या कार्यक्रमाची आतुरतेनं वाट पाहत आहे.”

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात