मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

विद्यार्थ्यांनो, केवळ शिक्षण घेऊन आणि डिग्री मिळवून अर्थ नाही; Career साठी 'या' गोष्टी ठरतील IMP

विद्यार्थ्यांनो, केवळ शिक्षण घेऊन आणि डिग्री मिळवून अर्थ नाही; Career साठी 'या' गोष्टी ठरतील IMP

 चला तर जाणून घेऊया या कोर्सेसबद्दल.

चला तर जाणून घेऊया या कोर्सेसबद्दल.

आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत, ज्या तुम्हाला डिग्री आणि शिक्षणासह करिअरसाठी महत्त्वाच्या ठरतील.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 30 नोव्हेंबर:काही वर्षांपुर्वीपर्यंत केवळ शिक्षण घेतलं आणि डिग्री (Career after Degree) किंवा डिप्लोमा केला के अनेकांना नोकरी मिळत होती. त्यावेळी साक्षरता कमी आणि नोकरीची संख्या अधिक होती. मात्र आजकालच्या काळात अशी परिस्थिती राहिली नाही. आजकाल फक्त शिक्षण आणि डिग्रीलाच नाही तर ती डिग्री नक्की कोणत्या क्षेत्रातील (How to make career after degree) आणि सध्याच्या स्पर्धेच्या युगात त्या क्षेत्राला किती Scope (careers with most scope) आहे यावरही करिअर ठरते. आजकाल करिअर करण्यासाठी जॉब मिळ्वण्यासाठी इंटर्नशिप (Top companies for Internship), ऑनलाईन कोर्सेस (Online courses for Better career) यासुद्धा गोष्टी महत्त्वाच्या असतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत, ज्या तुम्हाला डिग्री आणि शिक्षणासह करिअरसाठी महत्त्वाच्या ठरतील. चला तर मग जाणून घेऊया.

करिअर काउन्सिलरचा सल्ला नक्की घ्या

तुम्हाला तुमचा CV सुधारायचा असेल, कव्हर लेटर (How to write cover letter for jobs) टिप्स लिहायच्या असतील किंवा तुमच्यासाठी सर्वोत्तम करिअर पर्याय जाणून घ्यायचा असेल, तर तुमच्या युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसर किंवा करिअर काउन्सिलरचा नक्कीच सल्ला घ्या. अनेक विद्यापीठे Internship किंवा प्लेसमेंटच्या संधी देतात आणि त्यापूर्वी प्रशिक्षणासाठी अर्ज करावा ;लागतो. चांगल्या नोकरीसाठी, निश्चितपणे प्लेसमेंटबद्दल माहिती मिळवा. एका करिअर काउन्सिलरकडून तुम्हाला career बाबत चांगले मार्गदर्शन मिळू शकते.

Career Tips: तुम्हाला करिअरच्या सुरुवातीलाच यश मिळवायचं? मग वाचा या Tips

Internship करणं आवश्यक

तुमची प्रोफाइल अधिक चांगली आणि आकर्षक बनवण्यासाठी इंटर्नशिप (How to apply for Internship) आवश्यक आहे. इंटर्नशिपमध्ये (Website for Internship) अनुभवी लोकांसोबत काम करून नवीन गोष्टी शिकायला मिळतात. कामाच्या ठिकाणी जाण्यानं सॉफ्ट स्किल्स विकसित होण्यास मदत होते, जे करिअरमध्ये यशस्वी होण्यास मदत करेल. इंटर्नशिप साधारणतः 3 ते 6 महिने असते किंवा त्यापेक्षा अधिकही असू शकते. कोविड 19 साथीच्या आजारापासून, अनेक कंपन्या व्हर्च्युअल इंटर्नशिप देखील ऑफर करतात ज्यामध्ये घरून काम करावे लागते.

Online Upskilling courses: करिअरची नवी सुरुवात करताय? मग हे कोर्सेस कराच

Online courses ठरतील फायदेशीर

कोविड-19 पासून, अनेक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन कोर्सेस (Online courses) घेण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे खूप मदत होते. यामुळे तुम्ही तुमचे सॉफ्ट स्किल्स आणि कम्युनिकेशन स्किल्स स्वतः विकसित करू शकता,तुमच्या बायोडेटामध्ये स्किल्स add करण्यासाठी ऑनलाइन कोर्स (Best websites for Online courses) अधिक चांगले आहेत. बर्‍याच वेबसाइट विनामूल्य अभ्यासक्रम देतात. कोर्स निवडण्यासाठी तुम्ही तुमच्या क्षेत्रातील करिअरचे पर्याय पाहू शकता आणि त्यात आवश्यक स्किल्स असलेले कोर्स करू शकता. यामुळे तुम्हाला करिअरमध्ये पुढे जाण्यास मदत मिळेल.

First published:

Tags: Career, Education