मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Career Tips: तुम्हाला करिअरच्या सुरुवातीलाच यश मिळवायचं? मग या महत्त्वाच्या टिप्स नक्की येतील कामी

Career Tips: तुम्हाला करिअरच्या सुरुवातीलाच यश मिळवायचं? मग या महत्त्वाच्या टिप्स नक्की येतील कामी

तुम्हाला करिअरमध्ये पुढे जाण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही.

तुम्हाला करिअरमध्ये पुढे जाण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही.

आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स (Career Success Tips) देणार आहोत ज्यामुळे तुम्हाला करिअरमध्ये मदत होईल

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 30 नोव्हेंबर: दहावी किंवा बारावीच्या परीक्षांनंतर किंवा अगदी ग्रॅज्युएशननंतरही (Career after Graduation) अनेक विद्यार्थी आपल्या करिअरबाबत संभ्रमात असतात. ग्रॅज्युएशन एका फिल्डमध्ये केल्यानंतर आपल्या आवडीच्या फिल्डकडे (How to manage different fields career) वळतात. मात्र असं केल्यामुळे अनेक वर्ष शिक्षणात वाया जातात. याऐवजी ज्या विषयांमध्ये आपल्याला आवड (How to identify my interest career)आहे अशा विषयांमध्ये पदवी घेतली तर आपल्या पुढे करिअरचे मार्ग (How to be successful in career) कठीण नसतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स (Career Success Tips) देणार आहोत ज्यामुळे तुम्हाला करिअरमध्ये मदत होईलच पण त्यासोबतच तुम्ही करिअरमध्ये उत्तुंग शिखर गाठू शकाल. चला तर मग जाणून घेउया.

आपली प्रतिभा ओळखा (Find Your Interest)

पुस्तकी ज्ञानाच्या जोरावर उत्तम करिअर किंवा नोकरीची अपेक्षा करता येईल अशी आजची वेळ नाही. आता काळ बदलला आहे, आता पुस्तकी किडा बनून किंवा पदव्यांचा ढीग करून करिअर घडवता येत नाही. जर तुम्हाला उत्तम करिअर घडवायचे असेल तर तुम्हाला स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची आणि तुमच्यातील प्रतिभा शोधण्याची गरज आहे. एकदा का तुमच्यात लपलेले टॅलेंट सापडले की मग तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्या क्षेत्रात इतर लोकांपेक्षा चांगले स्थान मिळवू शकता.

अधिकाधिक संपर्क तयार करा (Improve your Contacts)

तुमचा जितका जास्त लोकांशी संपर्क असेल तितके तुमचे जीवन सोपे होईल. हीच गोष्ट करिअर घडवण्यासाठी लागू होते. तुमचे सर्वोत्तम संपर्क तुम्हाला उत्तम करिअरची संधी देऊ शकतात. त्यामुळे अधिकाधिक लोकांना भेटत राहा आणि त्यांना तुमची माहिती देत ​​राहा आणि त्यांची माहिती घ्या. जेव्हा करिअर किंवा नोकरीमध्ये चढ-उतार असतात तेव्हा हे संपर्क तुमच्यासाठी उपयोगी पडतात. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांच्या संपर्कात राहा.

Office Work Tips: आता ऑफिसमधील टेन्शन ऑफिसमध्येच ठेवा; असं करा Mood Fresh

टेक्नो फ्रेंडली व्हा (Be Techno-friendly)

उत्तम करिअरसाठी तुम्हाला टेक्नो फ्रेंडली असण्याची गरज आहे. आज स्पर्धा इतकी वाढली आहे की नवीन तंत्रज्ञान नाकारता येत नाही. तुमच्या क्षेत्राशी संबंधित तंत्रज्ञानाचे चांगले ज्ञान असावे. यासोबतच नवनवीन तंत्रज्ञान शिकत राहा.

इतरांशी चांगले वागा (behavior is IMP)

तुमची वागणूक हा तुमचा आरसा आहे, त्यामुळे इतरांशी चांगले वागायला शिका. तुम्ही लोकांशी चांगले वागलात तर लोक तुमच्यासारखेच नाहीतर लोक तुमच्यापासून दूर पळू लागतात. याशिवाय तुमची चांगली वागणूक तुमच्यासाठी प्रगतीचा मार्ग उघडते, त्यामुळे इतरांशी चांगले वागायला शिका.

स्वतःला नेहमी अपडेट करत राहा (Update yourself Regularly)

आजकाल मोबाईल अॅप्स देखील स्वतःला अपडेट करण्यासाठी बोलतात, त्यामुळे तुम्हीही वेळेनुसार स्वतःला बदलत राहणं गरजेचं आहे. करिअरच्या बाजारपेठेत आपले मूल्य टिकवून ठेवण्यासाठी, स्वतःला अपडेट करत राहणे खूप महत्वाचे आहे.

Career in IAF: 12वी नंतर वायुसेनेत Pilot व्हायचंय? इथे मिळेल संपूर्ण माहिती

प्लॅन B नक्की ठेवा (Make Plan B)

असे अनेकवेळा घडते जेव्हा तुमचे करिअरमध्ये घेतलेले निर्णय चुकीचे सिद्ध होऊ लागतात, अशा वेळी प्लॅन 'बी' तुमच्यासोबत ठेवा जेणेकरून तुमचा प्लॅन 'बी' वेळ आल्यावर कामी येईल. दोन-तीन करिअर प्लॅन्स तुमच्यासोबत ठेवल्याने तुमच्या अपयशाची शक्यता कमी होते.

First published:

Tags: Career, Tips