मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Work From Home करताना तणावात आहात? चिंता करू नका; या टिप्स येतील कामी

Work From Home करताना तणावात आहात? चिंता करू नका; या टिप्स येतील कामी

ताण कमी करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही टिप्स (Tips to Handle Stress) देणार आहोत.

ताण कमी करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही टिप्स (Tips to Handle Stress) देणार आहोत.

ताण कमी करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही टिप्स (Tips to Handle Stress) देणार आहोत.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 12 ऑगस्ट: कोरोनामुळे कॉर्पोरेट क्षेत्रातील (Corporate world) बहुसंख्य कर्मचारी सध्या वर्क फ्रॉम होम (Work From Home) करत आहेत. अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपतपर्यंत अनेकजण काम करत आहेत. त्यात महिला कर्मचाऱ्यांना घरचे सर्व काम करून ऑफिसचे काम करावे लागत आहेत. ऑफिसचं काम सांभाळत असताना कर्मचाऱ्यांवर ताण (stress while doing work from home) येतो आहे. हा ताण कमी करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही टिप्स (Tips to Handle Stress) देणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

ही असू शकतात तणावाची कारणं

तुमच्या नोकरीबद्दल खात्री नाही

तुमच्या पोस्टनुसार चुकीची पात्रता

कामाचे टेन्शन असणे

घरी वातावरण चांगलं नसणे

मनासारख्या गोष्टी न घडणे

हे वाचा - NEET Exam: विद्यार्थ्यांनो, NEET परीक्षेसाठी तयारी करताय? या पद्धतीनं करा अभ्यास

अशा पद्धतीनं दूर ठेवा तणाव

ताण तणाव दूर ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांगली झोप. दिवसभर काम केल्यानंतर चांगली आणि पूर्ण आठ तासांची झोप घेणं महत्त्वाचं आहे.  तसंच नियमित व्यायाम करणं आवश्यक आहे. संतुलित आहारही महत्त्वाचा आहे.

तणाव टाळण्यासाठी विश्रांती तंत्र आणि निरोगी जीवनशैली नेहमीच पुरेशी नसते. कधीकधी आपल्याला आपली कार्यशैली किंवा वातावरण बदलण्याची देखील आवश्यकता असू शकते.

जर तुमच्या कंपनीमध्ये काही ताण तणावाची स्थिती असेल तर याबाबत लगेच आपल्या वरिष्ठांना कळवा. कोणत्याही प्रकारचे शोषण किंवा छळ झाल्यास, आपल्या HR विभागाला सूचित करा जेणेकरून ते त्यास सामोरे जाऊ शकतील.

सर्वात महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला अधिक तणाव जाणवत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधा. काम करताना ताण तणाव कमी करण्यासाठी जे जे शक्य होईल ते करा.

First published:

Tags: Stress, Work from home