मुंबई, 12 ऑगस्ट: यंदाच्या NEET परीक्षेसाठीची तारीख (NEET Exam date) जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार आता विद्यार्थी अभ्यास करत आहेत. वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना नीट परीक्षा उत्तीर्ण केल्यावरच कॉलेजमध्ये प्रवेश मिळतो. NEET परीक्षेसाठी अभ्यास करताना विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येत आहेत. कमी वेळात जास्तीत जास्त अभ्यास कसा करावा याबाबत विद्यार्थ्यांना प्रश्न पडले आहेत. म्हणूनच आज आम्ही NEET परीक्षेसाठी स्मार्ट पद्धतीनं अभ्यास (NEET Exam study tips) कसा करावा याबाबत सांगणार आहोत.
रिव्हिजन महत्त्वाची
NEET परीक्षा इतर परीक्षांपेक्षा जास्त कठीण असते. मात्र जर या परीक्षेत यशस्वी व्हायचं असेल तर सुरुवातीपासून रिव्हिजन करणं आवश्यक आहे.मात्र जर असं केलं नाही तर विद्यार्थ्यांवर अधिक दबाव निर्माण होतो आणि त्या विषयांतील एकाही प्रश्नाचा परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्यांच्या मनावर परिणाम होतो. म्हणून, परीक्षेच्या 2-3 महिन्यांपूर्वी आणि परीक्षेच्या एक महिना आधी विश्रांतीसाठी ठेवणं आवश्यक आहे.
सराव करत राहा
NEET ची तयारी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे शिकणे, सराव करणे आणि टेस्ट देणे. बरेच विद्यार्थी यापैकी एक स्टेप वगळतात आणि दबावात राहतात. सराव करताना वेग आणि अचूकता हे आवश्यक भाग आहेत. म्हणून, आपल्या शिकण्याच्या प्रक्रियेत नेहमी वेग आणि अचूकतेवर लक्ष केंद्रित करा.
हे वाचा - Maharashtra CET 2021: प्रोफेशनल कोर्सेससाठी आजपासून रजिस्ट्रेशन सुरु
स्वतःचा टाइम टेबल
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःचा टाइम टेबल बनवणे. दुसऱ्याच्या बनवलेल्या वेळापत्रकाचं अनुसरण करण्याऐवजी आपल्यासाठी चांगल्या आणि कठीण विषयांचं विश्लेषण करा आणि त्यानुसार आपलं स्वतःचा टाइम टेबल बनवा. .
स्वतःच्या नोट्स तयार करा
आपल्या वर्गाच्या नोट्स सोबतच, सराव करताना महत्वाच्या मुद्द्यांच्या वेगळ्या नोट्स तयार करा आणि जर्नलमध्ये तुमच्या चुका नोंदवा. परीक्षा हॉलमध्ये जाण्यापूर्वी किंवा परीक्षेच्या एक दिवस आधी या नोट्स सुधारित करा. हे तुम्हाला मदत करेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Exam, Prepreparation