Home /News /career /

MH Board 10th Result: विद्यार्थ्यांनो 'या' वेबसाईट्सवर बघता येईल 10वीचा निकाल; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

MH Board 10th Result: विद्यार्थ्यांनो 'या' वेबसाईट्सवर बघता येईल 10वीचा निकाल; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

स्टेट बोर्डाचा दहावी परीक्षेचा निकाल

स्टेट बोर्डाचा दहावी परीक्षेचा निकाल

आज आम्ही तुम्हाला ज्या वेबसाईट्सवर दहावीचा निकाल बघता येईल (How to check Maharashtra SSC Board Result 2022) अशा सर्व Websites ची यादी देणार आहोत. तसंच निकाल बघण्याची संपूर्ण प्रोसेस सांगणार आहोत.

    मुंबई, 23 मे: यंदा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आलेले राज्यातील सर्व विभागांचे दहावी बोर्डाचे पेपर (10th Board exam results) पूर्णपणे तपासून झाले आहेत अशी माहिती SSC बोर्डाकडून (Maharashtra SSC Board) देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात लवकरच दहावी आणि बारावीचे निकाल (Maharashtra state Board SSC Exam Result 2022) जाहीर होण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे परीक्षा उशिरा घेण्यात आल्यात त्यामुळे बोर्डासमोर निकाल वेळेत लावण्याचं मोठं आवाहन होतं. तरीही यंदा हे निकाल वेळेतच लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे (MSBSHSE) द्वारे दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल तयार केला जात आहे. काही मीडिया रिपोर्ट्स प्रमाणे स्टेट बोर्डाचे दहावी परीक्षेचा निकाल (Maharashtra SSC Board Result date) हा येत्या 20 जूनपर्यंत तर बारावी परीक्षेचा निकाल हा 10 जूनपर्यंत जाहीर करण्यात येणायची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी सूत्रांनी अशी माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 11वीला प्रवेश घेण्यासाठी 'या' तारखेपासून सुरू होणार Online Registration; जाणून घ्या प्रोसेस मात्र हे महाराष्ट्र स्टेट बोर्ड दहावीचा निकाल नक्की कुठे बघायचा? कोणत्या वेबसाईट्सवर (Official Websites for Maharashtra SSC Board Result) हा निकाल दिसू शकेल? आणि निकाल बघण्यासाठी नक्की काय क्रेडेन्शियल्सची गरज पडेल? असे प्रश्न आता विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना पडू लागले आहेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला ज्या वेबसाईट्सवर दहावीचा निकाल बघता येईल (How to check Maharashtra SSC Board Result 2022) अशा सर्व Websites ची यादी देणार आहोत. तसंच निकाल बघण्याची संपूर्ण प्रोसेस सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. 'या' वेबसाईट्सवर बघता येईल निकाल 1. mahresult.nic.in 2. maharashtraeducation.com 3. mahahsscboard.maharashtra.gov.in. 4. sscresult.mkcl.org असा चेक करा निकाल इयत्ता 10वीचा महाराष्ट्र SSC निकाल तपासण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी सुरुवातीला www.mahresult.nic.in या महाराष्ट्र बोर्डाच्या निकाल पोर्टलच्या अधिकृत वेबपेजला भेट द्या. SSC परीक्षेसाठी MSBSHSE निकालासाठी अधिकृत वेबसाइट उघडल्यानंतर SSC परीक्षेचा निकाल हा पर्याय येईल ज्यावर विद्यार्थ्यांना पुढील वेब पेजवर भेट देण्यासाठी क्लिक करा. Career Tips: विद्यार्थ्यांनो, 11वीपासूनच सुरु करा 'या' IMP प्रवेश परीक्षांची तयारी; सुसाट वेगानं पुढे जाईल करिअर यानंतर आईचे नाव आणि रोल नंबर ही महत्त्वाची क्रेडेन्शियल्स टाकण्यास विसरू नका. विद्यार्थ्यांना दोन्ही आवश्यक क्रेडेन्शियल्स भरावे लागतील आणि नंतर View Result पर्यायावर क्लिक करा. तुमचा निकाल तुमच्या समोर असेल. पुढील रेफरन्ससाठी निकाल डाउनलोड किंवा सेव्ह करून ठेवा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: 10th class, Board Exam, Career, Exam result, Ssc board, State Board

    पुढील बातम्या