Home /News /career /

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 11वीला प्रवेश घेण्यासाठी 'या' तारखेपासून सुरू होणार Online Registration; जाणून घ्या प्रोसेस

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 11वीला प्रवेश घेण्यासाठी 'या' तारखेपासून सुरू होणार Online Registration; जाणून घ्या प्रोसेस

या तारखेपासून ऑनलाईन नोंदणी

या तारखेपासून ऑनलाईन नोंदणी

या तारखेपासून 11 वीमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी ऑनलाईन नोंदणी (Class 11th Online Admission) सुरू करू शकतील. तसेच दहावीचा निकाल (Class 10 Results) जाहीर झाल्यानंतर या अर्जाचा दुसरा टप्पा म्हणजेच भाग-II भरता येईल.

    मुंबई, 23 मे:  राज्यात अकरावीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. अकरावीत प्रवेश घेण्यासाठी त्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. मुंबई महानगर प्रदेश (MMR), पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती आणि नागपूर या ठिकाणी अकरावीमध्ये (Maharashtra FYJC Admissions 2022) प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. यासाठी 30 मे 22 पासून ऑनलाईन अर्जप्रकिया सुरू होणार आहे. ही अर्ज प्रक्रिया दोन टप्प्यांत पार पडणार आहे. यातील पहिला टप्पा म्हणेजच भाग-I 30 मे पासून सुरू होणार आहे. या तारखेपासून 11 वीमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी ऑनलाईन नोंदणी (Class 11th Online Admission) सुरू करू शकतील. तसेच दहावीचा निकाल (Class 10 Results) जाहीर झाल्यानंतर या अर्जाचा दुसरा टप्पा म्हणजेच भाग-II भरता येईल. द इंडियन एक्सप्रेसनं याबबातचं वृत्त दिलं आहे. सध्या 10वीच्या निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या आणि शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी FYJC (First Year Junior College) मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही प्रक्रिया महत्त्वपूर्ण असेल. अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी सराव अर्ज भरण्याचा मॉक राउंड सोमवारपासून (23 मे 2022) सुरू झाला आहे आणि रविवार (29 मे 2022) पर्यंत तो सुरु राहणार आहे. विद्यार्थी 11thadmission.org.in या वेबसाईटवर लॉग इन करू शकतात. त्यानंतर ते प्रवेश घेऊ इच्छित असलेले शहर निवडू शकतात. या मॉक राउंड प्रक्रियेत उमेदवारांसाठी डेमो-लॉगिन प्रणाली उपलब्ध करून दिली जाईल. Study Abroad: उच्च शिक्षणासाठी नक्की कोणत्या देशात जावं? इथे मिळेल टॉप देशांची लिस्ट; जाणून घ्या 29 मे रोजी ही अर्ज भरण्याची प्रक्रिया संपेल आणि हा डेमो-लॉगिन डेटा नष्ट केला जाईल. त्यानंतर 30 मेपासून विद्यार्थी 11 वी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्जाचा पहिला भाग भरू शकणार आहेत. ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्रातील काही निवडक शहरांमध्ये होणार आहे. या प्रक्रियेसाठी नोंदणी केल्यानंतर विद्यार्थ्यांना जिथे त्यांना प्रवेश घ्यायचा आहे अशा महाविद्यालयांची प्राधान्य यादी द्यावी लागेल. या प्राधान्य फॉर्ममध्ये किमान एक आणि जास्तीत जास्त 10 महाविद्यालयांची नावे भरता येतील. विद्यार्थ्यांना त्या महाविद्यालयांमध्ये गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जाईल. यावर्षी 11 वी प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक उशिरा जाहीर केलं गेलं. यापूर्वी 17 मे रोजी मॉकराऊंड सुरू होणार असल्याची चर्चा होती. मात्र तो स्थगित करण्यात आला होता आणि तो आता सोमरपासून (23 मे 2022) सुरु करण्यात आला आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना नोंदणी प्रक्रियेतील पहिला फॉर्म 30 मे 22 पासून भरता येईल. तर 10वीच्या निकालानंतर फॉर्मचा दुसरा भाग भरता येईल.
    First published:

    Tags: Board Exam, Education

    पुढील बातम्या