मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Office Tips: तुम्हालाही ऑफिसमध्ये स्वतःची प्रभावी जागा निर्माण करायचीये? मग फॉलो करा 'या' महत्त्वाच्या Tips

Office Tips: तुम्हालाही ऑफिसमध्ये स्वतःची प्रभावी जागा निर्माण करायचीये? मग फॉलो करा 'या' महत्त्वाच्या Tips

या टिप्सचा अवलंब करून तुम्ही इतरांपेक्षा चांगले (Office to behave in office) काम करू शकता. चला तर मग जाणून घेऊया काही महत्त्वाच्या टिप्स.

या टिप्सचा अवलंब करून तुम्ही इतरांपेक्षा चांगले (Office to behave in office) काम करू शकता. चला तर मग जाणून घेऊया काही महत्त्वाच्या टिप्स.

या टिप्सचा अवलंब करून तुम्ही इतरांपेक्षा चांगले (Office to behave in office) काम करू शकता. चला तर मग जाणून घेऊया काही महत्त्वाच्या टिप्स.

मुंबई, 28 नोव्हेंबर: आजकालचा काळ हा स्पर्धेचा आहे. अभ्यासात असो की ऑफिसमध्ये (Office behavior Tips) कॉर्पोरेट क्षेत्रात प्रत्येक व्यक्ती स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो.  चांगले कर्मचारी असूनही तुमच्याकडे दुर्लक्ष केले जाते. तुम्हीही एखाद्या चांगल्या ठिकाणी काम करत असाल आणि तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांपेक्षा नेहमीच पुढे (How to deal with competition in office) राहायचे असेल आणि ऑफिसमध्ये स्वतःची प्रभावी जागा निर्माण (How to be a better employee in office) करायची असेल तर आज आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत. या टिप्सचा अवलंब करून तुम्ही इतरांपेक्षा चांगले (Office to behave in office) काम करू शकता. चला तर मग जाणून घेऊया काही महत्त्वाच्या टिप्स.

टीकेला घाबरू नका

ऑफिसमध्ये जेव्हा जेव्हा तुमच्यावर टीका होते तेव्हा घाबरू नका आणि त्याचं टेन्शन घेऊ नका. प्रत्येक ऑफिसमध्ये काही चांगली माणसे असतात आणि काही वाईट लोकही असतात. जेव्हा जेव्हा तुमच्यावर टीका होते तेव्हा ती सकारात्मक पद्धतीने घ्या आणि स्वतःला सुधारा. जर तुम्हाला बॉसकडून काही वाईट ऐकायला मिळाले तर ते मनावर घेऊ नका, परंतु स्वत: ला सुधारा. खरं म्हणजे टीका ही अशा लोकांवर असते जे काम करतात आणि अतिरिक्त प्रयत्न करतात. त्यामुळे टीकांकडे दुर्लक्ष करा.

गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिका

कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणे नेहमीच आव्हानात्मक असते, त्यामुळे तुम्हीही गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिकले पाहिजे. काहीवेळा तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी बोलल्या जातील कारण कामाच्या ठिकाणी प्रत्येकजण तुमचे हितचिंतक असतोच असं नाही. त्यामुळे दुःखी होण्याऐवजी अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करून आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. इतरांची पर्वा न करता काम करत राहिल्यास प्रगती करत राहाल.

'हा' कोर्स केल्यानंतर मिळू शकते परदेशात नोकरी; 'विशेष' लोकांना करू शकाल मदत

स्वतःची चूक मानायला शिका 

तुमच्या बॉसला तुमच्या कामात काही उणीव आढळून आल्या किंवा तुमचे काम या महिन्यात समाधानकारक झाले नाही असे म्हटल्यास बॉसला भेटा आणि त्यांची चूक कुठे झाली हे नम्रपणे विचारा. त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला हवे असल्यास तुम्ही बॉसकडून काही टिप्स देखील घेऊ शकता. यामुळे तुम्हाला तुमच्या चुका तर कळतीलच पण बॉसशी तुमचे नातेही सुधारेल.

ऑफिसमध्ये नेहमी सतर्क राहा

ऑफिस संपण्याची वाट पाहणारे आणि घड्याळाकडे पाहत राहणारे अनेक जण असतात. अशा लोकांनी थोडे सावध राहण्याची गरज आहे. खरंतर तुमच्या या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात येतात. त्यामुळे ऑफिसमध्ये सावध राहा, वेब गॉसिप टाळा आणि ब्रेक घ्या.

First published:
top videos

    Tags: Career, Career opportunities, Tips