मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Career in Sign Language: 'हा' कोर्स केल्यानंतर थेट मिळू शकते परदेशात नोकरी; 'विशेष' लोकांना करू शकाल मदत

Career in Sign Language: 'हा' कोर्स केल्यानंतर थेट मिळू शकते परदेशात नोकरी; 'विशेष' लोकांना करू शकाल मदत

Sign Language मध्ये करिअर करण्यासाठी काही टिप्स

Sign Language मध्ये करिअर करण्यासाठी काही टिप्स

तुम्‍ही सांकेतिक भाषेत करिअर करण्‍याची तयारी करत असाल, तर या टिप्‍स तुमच्‍यासाठी (Career as Interpreter) उपयोगी पडू शकतात

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 25 नोव्हेंबर: काही लोकांना जन्मापासून ऐकू किंवा बोलता येत नाही, तर काहींना अपघातात त्यांची ऐकण्याची/बोलण्याची शक्ती संपते. अशा लोकांना त्यांचे शब्द इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि इतरांच्या गोष्टी चांगल्या प्रकारे समजण्यासाठी त्यांची सांकेतिक भाषा (Sign Language Course in India) समजू शकणाऱ्या तिसऱ्या व्यक्तीची गरज असते. या तिसऱ्या व्यक्तीला ट्रान्सलेटर जॉब्स (latest Translator Jobs) किंवा इंटरप्रिटर जॉब्स (Interpreter Jobs India) म्हणतात.

भारतात अशा अनेक संस्था आहेत, जिथे सांकेतिक भाषेचे अभ्यासक्रम (How to Learn sign language Online) चालवले जातात. काही लोक आपल्या कुटुंबातील कोणालातरी मदत करण्यासाठी, कोणी समाजसेवा करण्यासाठी तर कोणी यात करिअर करण्यासाठी (career in sign language) हा कोर्स करतात. सांकेतिक भाषा तज्ज्ञांसाठी परदेशात रोजगाराच्या अनेक संधी आहेत. तुम्‍ही सांकेतिक भाषेत करिअर करण्‍याची तयारी करत असाल, तर या टिप्‍स तुमच्‍यासाठी (Career as Interpreter) उपयोगी पडू शकतात. चाल तर मग जाणून घेऊया.

सांकेतिक भाषा म्हणजे काय? (What is Sign Language?)

ज्यांना बोलता येत नाही, ऐकू येत नाही, ते हातवारे करून आपल्या भावना, कल्पना आणि शब्द व्यक्त करतात. हे जेश्चर समजून घेण्यासाठी व्यावसायिक स्तरावर अनेक संस्थांमध्ये सांकेतिक भाषेचे अभ्यासक्रम चालवले जातात. जर तुम्हाला सांकेतिक भाषेत तज्ञ व्हायचे असेल तर तुम्ही त्यासंबंधीचा कोर्स देखील करू शकता.

पात्रतेपेक्षा वरचढ ठरली बॉडी फिगर, लठ्ठपणामुळे महिला झाली REJECT

कोणालातरी मदत करण्यासाठी करा कोर्स

दुभाषी ओठांनी न बोलता लोकांशी बोलू शकतो. ही कला शिकण्यासाठी सांकेतिक भाषेचा अभ्यासक्रम केला जातो. सांकेतिक भाषा दुभाषी बनून, तुम्ही मूकबधिर मुलांच्या आयुष्यात आशेचा नवीन किरण आणू शकता. यासाठी पदविका, प्रमाणपत्र आणि पदवी अभ्यासक्रम सुरू आहेत.

करिअरसाठी हा कोर्स करा

अनेक शाळा-महाविद्यालयांमध्ये कर्णबधिर मुलांव्यतिरिक्त सामान्य विद्यार्थीही सांकेतिक भाषा शिकत आहेत. त्यांना दोन महत्त्वाच्या मार्गांनी शिकवले जाते - मौखिक संभाषण आणि दुसरी भारतीय सांकेतिक भाषा. हे अभ्यासक्रम तीन महिन्यांपासून ते एक वर्षाचे असतात. यामध्ये, सांकेतिक भाषेच्या अचूकतेशिवाय, इतर कोणत्याही शारीरिक समस्यांनी ग्रस्त असलेल्या मुलांना शिकवण्यासाठी इतर अनेक अभ्यासक्रम आहेत. स्वयंसेवी संस्थांमध्ये सांकेतिक भाषेतील दुभाष्याची गरज जास्त आहे

First published:

Tags: Career opportunities