मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

NEET बाबत फिरणारी ‘ती’ नोटीस नकली, अफवांवर विश्वास ठेवू नका

NEET बाबत फिरणारी ‘ती’ नोटीस नकली, अफवांवर विश्वास ठेवू नका

राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षेबाबत (NEET) सध्या एक नोटीस सर्वत्र व्हायरल होत असून ती बोगस असल्याचं राष्ट्रीय परीक्षा एजन्सीनं (NTA) स्पष्ट केलं आहे.

राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षेबाबत (NEET) सध्या एक नोटीस सर्वत्र व्हायरल होत असून ती बोगस असल्याचं राष्ट्रीय परीक्षा एजन्सीनं (NTA) स्पष्ट केलं आहे.

राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षेबाबत (NEET) सध्या एक नोटीस सर्वत्र व्हायरल होत असून ती बोगस असल्याचं राष्ट्रीय परीक्षा एजन्सीनं (NTA) स्पष्ट केलं आहे.

  • Published by:  desk news

नवी दिल्ली, 8 जुलै : राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षेबाबत (NEET) सध्या एक नोटीस सर्वत्र व्हायरल होत असून ती बोगस असल्याचं राष्ट्रीय परीक्षा एजन्सीनं (NTA) स्पष्ट केलं आहे. विद्यार्थी आणि पालकांनी अशा नकली नोटिसवर (Bogus Notices) विश्वास न ठेवता केवळ अधिकृत वेबसाईटवरून (Authorized Websites) प्रसारित केल्या जाणाऱ्या माहितीचाच आधार घ्यावा, असं आवाहनदेखील NTA कडून करण्यात आलं आहे.

नकली नोटिशीतील तपशील

NEET ची परीक्षा 1 ऑगस्टऐवजी आता 5 सप्टेंबर रोजी घेण्यात येईल, असं या नकली नोटिशीत म्हणण्यात आलंय. मात्र अशा प्रकारे सरकारचं कुठलंही नियोजन नसून काही असामाजिक घटकांकडून विद्यार्थी आणि पालकांचा संभ्रम वाढवण्यासाठी असे गैरसमज जाणीवपूर्वक पसरवले जात असल्याचं एनटीएनं म्हटलं आहे.

विश्वास ठेऊ नका – एनटीए

सध्या देशातून कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी त्याचा प्रभाव अद्यापही अनेक भागांत कायम आहे. काही राज्यात दैनंदिन 10 हजारांच्या आसपास रुग्ण आढळून येत आहेत. अशा परिस्थितीत या परिक्षेच्या नियोजनाबाबत अद्यापही विचारविनिमय सुरू असून लवकरच त्याबाबतचं स्पष्ट धोरण जाहीर करण्यात येईल, असं एनटीएनं स्पष्ट केलं आहे. मात्र तोपर्यंत कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये आणि खातरजमा केल्याशिवाय कुठलीही माहिती फॉरवर्ड करू नये, अशी विनंती एनटीएनं विद्यार्थी आणि पालकांना केली आहे.

हे वाचा -RBI ने SBI सह या 14 बँकांना ठोठावला दंड, बँक ऑफ महाराष्ट्राचाही समावेश

अधिकृत वेबसाईटवर लक्ष ठेवा

एनटीएची अधिकृत वेबसाईट nta.ac.in आणि ntaneet.nic.in यावर परीक्षांचं वेळापत्रक, नियोजन, तारखा आणि नियम याबाबतची सविस्तर माहिती अपलोड करण्यात येते. केवळ याच वेबसाईटवरील माहितीवर विद्यार्थ्यांनी अवलंबून राहावं आणि इतर कुठल्याही मार्गानं आलेली माहिती या वेबसाईटवरील माहितीशी जुळवून पाहावी, असा सल्ला देण्यात आला आहे. अगोदरच कोरोना आणि लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यात अशा अफवांमुळे विद्यार्थ्यांना मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे. ही चुकीची नोटीस पसरवणाऱ्या घटकांचा सायबर पोलीस शोध घेत असून लवकरच त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असं सांगितलं जात आहे.

First published:

Tags: Government, Rumors, Social media viral