जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / MBBS in Hindi: आता हिंदीतून मिळणार MBBS चे धडे; या राज्य सरकारचा पायलट प्रोजेक्ट

MBBS in Hindi: आता हिंदीतून मिळणार MBBS चे धडे; या राज्य सरकारचा पायलट प्रोजेक्ट

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

एमबीबीएसचा अभ्यासक्रम आता हिंदी भाषेत (MBBS study now Hindi language) शिकवण्याचा निर्णय मध्य प्रदेश सरकारने घेतला आहे. हिंदीतील एमबीबीएस अभ्यासक्रमाचा पायलट प्रोजेक्ट (pilot project) राजधानी भोपाळमधील गांधी मेडिकल कॉलेज (GMC Bhopal) येथून सुरू होणार आहे.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    भोपाळ, 25 फेब्रुवारी: एमबीबीएसचा अभ्यासक्रम आता हिंदी भाषेत (MBBS study now Hindi language) शिकवण्याचा निर्णय मध्य प्रदेश सरकारने घेतला आहे. हिंदीतील एमबीबीएस अभ्यासक्रमाचा पायलट प्रोजेक्ट (pilot project) राजधानी भोपाळमधील  गांधी मेडिकल कॉलेज (GMC Bhopal) येथून सुरू होणार आहे. मध्य प्रदेशचे आरोग्य शिक्षण मंत्री विश्वास सारंग (Vishwas Sarang) यांनी गुरुवारी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, ‘आता राज्यात बॅचलर ऑफ मेडिसीन (Bachelor of Medicine) आणि बॅचलर ऑफ सर्जरी (Bachelor of Surgery) हे भारताच्या राष्ट्रभाषेतून म्हणजेच हिंदी भाषेत (Hindi language) शिकवलं जाईल. गांधी मेडिकल कॉलेज, भोपाळ या एप्रिल महिन्यापासून हिंदी भाषेतील एमबीबीएस अभ्यासक्रमही सुरू करणार आहे,’ असंही त्यांनी सांगितलं. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार सारंग म्हणाले की, ‘आम्ही आता एमबीबीएसच्या अभ्यासात हिंदीचा समावेश करत आहोत. आम्ही हिंदी दिवसाला (Hindi divas) याची घोषणा केली होती आणि आम्ही त्याबाबत संपूर्ण कृती आराखडा तयार केला आहे. त्याचं काम सुरू झालं आहे. हिंदीतील एमबीबीएसचा अभ्यासक्रम एप्रिल महिन्यापासून सुरू होईल.’ हे वाचा- Career Tips: तुम्हीही करिअरची आतच सुरुवात करताय? मग हे कोर्सेस नक्की येतील कामी भोपाळमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, एमबीबीएस हिंदी माध्यमातून शिकवले जाईल. भोपाळचे गांधी मेडिकल कॉलेज एप्रिलपासून हिंदीमध्ये एमबीबीएस अभ्यासक्रम सुरू करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान (CM Shivraj Singh Chauhan) यांच्या इच्छेनुसार, कृती आराखडा तयार करून कामाला रीतसर सुरुवात करण्यात आल्याची माहिती सारंग यांनी दिली. हिंदी माध्यमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण घेणं सोपं व्हावं म्हणून ही व्यवस्था करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, विद्यार्थ्यांना इंग्रजीसोबतच हिंदीची पुस्तकेही (Hindi books) उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. हिंदी सेलची रीतसर स्थापना करून सुव्यवस्थित अभ्यासक्रम तयार करण्यात येत आहे. तसेच त्यात विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेण्यात आलं आहे, अशी माहिती सारंग यांनी दिली. हे वाचा- महत्त्वाची बातमी! बारावी परीक्षेच्या टाइम टेबलमध्ये बदल; हे 2 पेपर्स ढकलले पुढे गेल्या आठवड्यात सारंग यांनी इंदूरमध्ये स्थापन केलेल्या समितीच्या विशिष्ट सदस्यांची भेट घेतली होती. मध्य प्रदेशात एमबीबीएसचे शिक्षण हिंदीतून सुरू करण्यासाठी तयारी जोरात सुरू झाली आहे, असे सांगून ते म्हणाले की, मध्य प्रदेश हे पहिले राज्य असेल जिथे वैद्यकीय शिक्षण हिंदीतून (medical education in Hindi) शिकवले जाईल. कुठलाही अभ्यासक्रम मातृभाषेतून शिकवला गेला तर मुलांना चांगल्या पद्धतीने समजतो असं संशोधनाअंती सिद्ध झालं आहे. त्यामुळे हिंदीतून वैद्यकीय शिक्षण सुरू झाल्यास विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होऊ शकेल. या पायलट प्रोजेक्टचं यश पाहून पुढचा निर्णय सरकार घेईल.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात