Home /News /career /

कंपनीचा नोटीस पिरेड म्हणजे सर्वात कठीण काळ; पण 'या' गोष्टी कराल तर आनंदात जाईल पूर्ण काळ

कंपनीचा नोटीस पिरेड म्हणजे सर्वात कठीण काळ; पण 'या' गोष्टी कराल तर आनंदात जाईल पूर्ण काळ

आज आम्ही तुम्हाला Notice Period वर असताना नक्की काय करावं आणि काय करू नये हे सांगणार आहोत.

    मुंबई, 22 जून: एका कंपनीला सोडून जाताना (Resign from Job) आणि नवीन ठिकाणी जॉईन (How to join new Job) करतानाचा काळ म्हणजे Notice Period. प्रत्येक कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी नोटीस पिरेड (Notice Period) ठेवते. जॉबचा राजीनामा दिल्यानंतर नोटीस पिरेड (How to complete Notice Period) पूर्ण करूनच कंपनी पूर्ण[ने सोडता येते. काही कंपन्यांमध्ये हा नोटीस पिरेड वर्क (Notice Period) महिन्याचा असतो तर काहींमध्ये तीन महिन्याचा. मात्र बऱ्याच कर्मचाऱ्यांसाठी हा काळ त्रासदायक असतो असं अनेक जण सांगतात. या काळात कंपनीकडून अपेक्षित सपोर्ट मिळत नाही असं काही जण म्हणतात. मात्र असं असेलच असं नाही. काही कर्मचाऱ्यांसाठी नोटीस पिरेड (How to spend notice period in company) चांगलाही ठरतो. पण जर तुम्हीही नोटीस पिरेडवर (Notice period do's and Don'ts) आहात किंवा नोकरी सोडण्याचा विचार करत असाल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला Notice Period वर असताना नक्की काय करावं आणि काय करू नये हे सांगणार आहोत. जाॅबची आणखी एक संधी! Home Appliance हा कोर्स देऊ शकतो तुमच्या हाताला काम : VIDEO नोटीस पिरेडवर असताना हे करा तुमचा नोटिस पिरेड वर असताना स्वत: कमी काम करण्याचा विचार येतो. मात्र असा करू नका. नोटीस पिरेड दरम्यान तितक्याच ऊर्जेने काम करा. तुमच्या कामात कमीपणा जाणवल्यास तुम्हाला त्रास होऊ शकतो. म्हणूनच कामात कमीपणा आणू नका. तुमचा नोटिस पिरेड वर असताना तूम्हाला तुमच्या कामाच्या शेवटच्या दिवसाबद्दल तुमचे क्लायंट, सहयोगी आणि सहकाऱ्यांना अपडेट करणे देखील आवश्यक आहे. तुमची बदली होईपर्यंत तुम्ही त्यांना तुमच्या व्यवस्थापकाचे संपर्क तपशील प्रदान करू शकता किंवा कार्यसंघातील पुढील कमांड देखील देऊ शकता. नोटीस पिरेडवर असताना नेहमी तुमच्या सहकाऱ्यांसोबत नेहमी चांगले वागा. जरी तुम्ही ही कंपनी सोडून जात असाल तरी तुमचे संबंध टिकवून ठेवा. ऑफिसमध्ये असताना तुमच्या मॅनेजर किंवा बॉससोबत भविष्यातील संधींबाबत संवाद साधा. तसंच तुमच्या बॉससोबत चांगले संबंध तयार करा. परदेशात शिक्षण घेणं अजिबात कठीण नाही; फक्त जाण्याआधी 'या' गोष्टी कराच हे कधीच करू नका जरी तुम्हाला असे वाटत असेल की बहुतेक कामाचा भार तुमच्या खांद्यावर आहे, त्यामुळे तुमच्या डेस्कवर काम करण्यास टाळाटाळ करू नका. यामुळे तुमचं इम्प्रेशन कमी होऊ शकतं. तुम्ही वैयक्तिक फोन कॉल्स घेण्याऐवजी किंवा सोशल मीडियावरून स्क्रोल करण्याऐवजी तुमच्या टीममेट्सना तुमची मदत देऊ शकता. यामुळे तुमच्या सहकाऱ्यांसोबत तुमचे चांगले संबंध राहतील. नवीन ऑफिस, त्यांच्या मस्त ऑफिस स्पेसेस, एंटरटेनमेंट झोन इत्यादींबद्दल उत्साही वाटणे स्वाभाविक आहे, परंतु तुमच्या टीममध्ये याबद्दल बढाई मारू नका.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career, Career opportunities, Job, Job alert

    पुढील बातम्या