Home /News /maharashtra /

Nashik : जाॅबची आणखी एक संधी! Home Appliance हा कोर्स देऊ शकतो तुमच्या हाताला काम : VIDEO

Nashik : जाॅबची आणखी एक संधी! Home Appliance हा कोर्स देऊ शकतो तुमच्या हाताला काम : VIDEO

स्वामी

स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट, नाशिक

नाशिकमध्ये होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी विवेकानंद इन्स्टिट्युटमध्ये 'घरगुती उपकरण रिपेअरींग' कोर्सचे (Home Appliance) मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

  नाशिक, 22 जून : दहावी आणि बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांमध्ये काॅलेजात प्रवेश घेण्याची लगबग सुरु आहे. करीअरसाठी (Career) नक्की कोणतं फिल्ड निवडावं यात विद्यार्थी संभ्रमात आहेत. कोणत्या फिल्डमध्ये अधिक पगाराची नोकरी लागू शकते? हे सर्व प्रश्न विद्यार्थ्यांना पडले आहेत. पण चिंता करू नका. जर तुम्हाला दहावी, बारावीनंतर घरगुती उपकरण रिपेअरींग कोर्समधून (Home Appliance) करिअर घडवायचे असेल तर त्याबद्दल या रिपोर्टर म्हणून आम्ही माहिती देणार आहोत. (Home Appliance Course in Nashik)  वाचा : क्या बात है! इलेक्ट्रिसिटी बचत करण्याचा हा पर्याय आहे भन्नाट; कित्येक वर्ष बिल येईल ZERO श्री रामकृष्ण आरोग्य संस्थान संचलित विवेकानंद इन्स्टिट्युटमध्ये घरगुती उपकरण रिपेअरींग कोर्सचे  मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणानंतर नोकरीची संधी मिळावी, यासाठी या इन्स्टिट्युटकडून 'घरगुती उपकरण रिपेअरींग' कोर्स मोफत शिकविला जाणार आहे. विवेकानंद इन्स्टिट्युट हे गेल्या 2007 सालापासून सामाजिक कार्याच काम करत आहे.आतापर्यंत या इन्स्टिट्युटमुळे अनेक गरजू आणि होतकरू मदत झाली आहे.

  गुगल मॅपवरून साभार... 

  कुठे शिकवला जाणार हा कोर्स ?  नाशिक शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी मेहेर सिग्नलजवळ इंडियन बँकेजवळ अनंत गौरव चेंबर तिसऱ्या मजल्यावर सुरू असून चौकशीसाठी 7588188061/7588188062 या मोबाईल क्रमांकावर विद्यार्थी संपर्क साधू शकतात.  विद्यार्थ्यांची मर्यादा किती आहे ?  या प्रशिक्षणामध्ये एक बॅच असणार आहे. त्यात 30 विद्यार्थी असतील. एक बॅच पूर्ण झाल्यास तात्काळ दुसरी बॅच सुरू केली जाईल. म्हणजे एकूण 30 विद्यार्थी एका बॅच मध्ये प्रशिक्षण घेतील. प्रशिक्षणाचा कालावधी हा 3 महिन्यांचा आहे. दररोज 2 तास प्रशिक्षण दीले जाईल. वाचा : फारच खास आहे पायल-संग्रामची लग्नपत्रिका; पुन्हा-पुन्हा पाहिला जातोय INVITATION VIDEO  या कोर्सची वैशिष्ट्ये काय आहेत?  1) पूर्णतः मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. 2) कोर्स पूर्ण झाल्यानंतर शासनमान्य प्रमाणपत्र दिले जाणार आहे. 3) स्वयंरोजगार निर्मिती संदर्भात मार्गदर्शन केलं जाणार आहे.  या कोर्ससाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत ? 1) आधारकार्ड झेरॉक्सची 1 प्रत 2) पासपोर्ट साईज 2 फोटो 3) 8 वी पास शाळेच्या दाखल्याची 1 झेरॉक्स 4) वयोमर्यादा 18 ते 45 वर्षे इतकी आहे.
  First published:

  Tags: Career opportunities, Maharashtra News, जॉब

  पुढील बातम्या