मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

Noble Prize 2022 : रसायनशास्त्राचे नोबेल पुरस्कार 3 शास्त्रज्ञांना जाहीर, एकाला 21 वर्षांनी दुसऱ्यांदा मिळाला सन्मान

Noble Prize 2022 : रसायनशास्त्राचे नोबेल पुरस्कार 3 शास्त्रज्ञांना जाहीर, एकाला 21 वर्षांनी दुसऱ्यांदा मिळाला सन्मान

पारितोषिकात एक पदक आणि 10 दशलक्ष स्वीडिश क्राउन किंवा $915,072 दिले जातात. 10 डिसेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमात रोख स्वरूपात दिले जातील.

पारितोषिकात एक पदक आणि 10 दशलक्ष स्वीडिश क्राउन किंवा $915,072 दिले जातात. 10 डिसेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमात रोख स्वरूपात दिले जातील.

पारितोषिकात एक पदक आणि 10 दशलक्ष स्वीडिश क्राउन किंवा $915,072 दिले जातात. 10 डिसेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमात रोख स्वरूपात दिले जातील.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • New Delhi, India
  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर : रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. क्लिक आणि बायोर्थोगोनल रसायनशास्त्राच्या विकासासाठी बुधवारी तीन शास्त्रज्ञांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये कॅरोलिन आर बर्टोझी, मॉर्टन मेडेल आणि के बॅरी शार्पलेस यांचा समावेश आहे. 81 वर्षीय शार्पलेस यांना 2001 मध्ये इतर दोन शास्त्रज्ञांसह या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. क्लिक केमिस्ट्री आणि बायोर्थोगोनल केमिस्ट्री या नावाने ओळखल्या जाणार्‍या तंत्रज्ञानाचा वापर सेल्सचा शोध घेण्यासाठी आणि जैविक प्रक्रियांचा मागोवा घेण्यासाठी जागतिक स्तरावर केला जातो.

बायोर्थोगोनल प्रक्रियेच्या वापरामुळे संशोधकांना कर्करोगाच्या औषधांवर संशोधन करणे सोपे झाले आहे, ज्याची क्लिनिकल चाचण्यांमध्ये चाचणी केली जात आहे, असे पुरस्कार देणाऱ्या संस्थेने एका निवेदनात म्हटले आहे. हा पुरस्कार रॉयल स्वीडिश अॅकॅडमी ऑफ सायन्सेसद्वारे दिला जातो. पारितोषिकात एक पदक आणि 10 दशलक्ष स्वीडिश क्राउन किंवा $915,072 दिले जातात. 10 डिसेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमात रोख स्वरूपात दिले जातील.

मेडिसिन आणि क्वांटम फिजिक्ससाठी नोबेल

नोबेल पारितोषिक 2022 ची सुरुवात 3 ऑक्टोबर रोजी वैद्यकीय क्षेत्रातील नावाच्या घोषणेसह झाली आहे, जिथे यावर्षी स्वीडिश शास्त्रज्ञ स्वंते पाबो यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. निअँडरथल डीएनएवरील शोधासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. 4 ऑक्टोबर रोजी भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला.

क्वांटम फिजिक्समधील उल्लेखनीय कार्यासाठी या वर्षी तीन शास्त्रज्ञांना नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये फ्रान्सचे अॅलेन आस्पेक्ट, अमेरिकेचे जॉन एफ क्लोजर आणि ऑस्ट्रियाचे अँटोन झेलिंगर यांचा समावेश आहे, ज्यांना संयुक्तपणे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

या वैज्ञानिकांना मिळाले दोन-दोन नोबेल -

साहित्याचा नोबेल पुरस्कार गुरुवारी दिला जाणार आहे. नोबेल शांतता पुरस्काराची घोषणा शुक्रवारी, तर अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिकाची घोषणा 10 ऑक्टोबर रोजी होणार आहे. के शार्पलेस दोन नोबेल पारितोषिक जिंकलेल्या शास्त्रज्ञांच्या गटात सामील होतात. ज्यांना दोन नोबेल पारितोषिके मिळाली आहेत. इतर शास्त्रज्ञांमध्ये जॉन बार्डीन यांचा समावेश आहे, ज्यांना भौतिकशास्त्रात दोनदा नोबेल पारितोषिक मिळाले आहे. याशिवाय फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये मेरी क्युरी, केमिस्ट्री आणि पीसमध्ये लिनस पॉलिंग यांना दोनदा नोबेल मिळाले आहे. रसायनशास्त्राच्या क्षेत्रात दोनदा नोबेल पारितोषिक मिळालेले फ्रेडरिक सेंगरही आहेत.

First published: