मुंबई, 27 ऑक्टोबर: राष्ट्रीय आरोग्य अभियान रायगड (National Health Mission Raigad) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (NHM Raigad Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी आरबीएसके या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 01 नोव्हेंबर 2021 असणार आहे.
या पदांसाठी भरती
वैद्यकीय अधिकारी आरबीएसके (Medical Officer RBSK) - एकूण जागा 21
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
वैद्यकीय अधिकारी आरबीएसके (Medical Officer RBSK) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी BAMS पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांना संबंधित विषयांमध्ये अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगार
वैद्यकीय अधिकारी आरबीएसके (Medical Officer RBSK) - 28,000/- रुपये प्रतिमहिना
काही महत्त्वाच्या सूचना
ही पदभरती कंत्राटी तत्वावर घेण्यात येणार आहे.
या पदभरतीबाबतचे सर्व नियम हे शासनाच्या नियमांनुसार असणार आहेत.
उच्च शिक्षण आणि अनुभवी उमेदवारांना या पदभरतीमध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे.
या पदभरतीसाठी खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षांची वयोमर्यादा असणार आहे तर मागासवर्गीय प्रवर्गासाठी 43 वर्षांची वयोमर्यादा असणार आहे.
TRIFED Recruitment: आदिवासी सहकारी विपणन विकास फेडरेशन मुंबई इथे भरती
ही कागदपत्रं आवश्यक
दहावी, बारावी आणि पदवीच्या संपूर्ण गुणपत्रिका
शाळा सोडल्याचा दाखला
आधारकार्ड किंवा इतर ओळखपत्र
दोन पासपोर्ट साईझ फोटो
जातीचा दाखला
मुलाखतीचा पत्ता
राष्ट्रीय आरोग्य अभियान, रम नं. 213 जिल्हा रुग्णालय अलिबाग जि. रायगड -402201.
मुलाखतीची तारीख - 01 नोव्हेंबर 2021
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://zpraigad.maharashtra.gov.in/ या लिंकवर क्लिक करा
महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career opportunities