जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / NEET 2022 परीक्षा आता वाटेल Easy; 'या' लिंकवर मिळतील मागील काही वर्षातील Question Papers

NEET 2022 परीक्षा आता वाटेल Easy; 'या' लिंकवर मिळतील मागील काही वर्षातील Question Papers

NEET UG काही वर्षातील पेपर्स

NEET UG काही वर्षातील पेपर्स

आज आम्ही तुम्हाला NEET UG परीक्षेचे गेल्या काही वर्षातील पेपर्स (NEET UG Exam Previous years question papers) दाखवणार आहोत

  • -MIN READ
  • Last Updated :

    मुंबई, 05 जून: दरवर्षी देशात अनेक प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. NTA द्वारे घेतलेल्या प्रवेश परीक्षेद्वारे, विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रम, अभियांत्रिकी अभ्यासक्रम इत्यादी अभ्यासक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते. वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी दरवर्षी लाखो उमेदवार NEET परीक्षेला बसतात. NEET परीक्षा खूप कठीण असते. वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी या परीक्षेसाठी अनेक उमेदवारांना अनेक प्रयत्न करावे लागतात. NTA (National Testing Agency) NEET UG परीक्षा (NEET UG Exam Preparation 2022) आणि NEET PG (NEET Exam Preparation tips 2022) परीक्षा दोन्ही आयोजित करते. त्यातील NEET UG परीक्षा 17 जुलै 2022 रोजी (NEET UG परीक्षेची तारीख) घेतली जाणार आहे. या परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या यूजी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळेल. NEET UG 2022 परीक्षेसाठीच्या अधिक माहिती माहितीसाठी अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in ला भेट देणं आवश्यक असणार आहे. NEET Exam 2022: भावी डॉक्टरांनो, मनासारखं मेडिकल कॉलेज हवंय? मग Mock Tests देणं आवश्यक; ही घ्या Link ही परीक्षा पास करणं इतकं सोपं नाही. यासाठी प्रचंड मेहनत करणं आवश्यक आहे. म्हणून या परीक्षेचा अभ्यास करताना काही महत्त्वाच्या गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. जसं की मॉक टेस्ट देणे आणि गेल्या काही वर्षांतील NEET पेपरचा सखोल अभ्यास करणे. जर तुम्ही गेल्या काही वर्षातील NEET चे पेपर्स संपूर्ण सोडवून बघितले तर ही परीक्षा उत्तीर्ण कर्ण तुमच्यासाठी कठीण असणार नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला NEET UG परीक्षेचे गेल्या काही वर्षातील पेपर्स (NEET UG Exam Previous years question papers) दाखवणार आहोत. हे सर्व पेपर्स तुम्हाला खाली दिलेल्या लिंकवर मिळणार आहेत. ही परीक्षा पास करण्यासाठी तुमचा आत्मविश्वास नेहमी उच्च ठेवा आणि पेपर दरम्यान अजिबात घाबरू नका. जर तुम्ही पेपरमध्ये अधिक आत्मविश्वासाने उपस्थित असाल तर तुमच्या यशाची शक्यता वाढेल. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही कोणत्याही प्रकारे यशस्वी होत नसाल तर निराश होण्याची गरज नाही. भविष्यात तुम्हाला आणखी अनेक संधी मिळतील. तुम्ही तुमच्या अपयशातून शिका आणि पुढे जा.

    TITLELINK
    NEET Previous Years solved Papershttps://www.topperlearning.com/neet/previous-year-papers

    ही लिंक ओपन करून तुम्हाला NEET UG चे सर्व गेल्या वर्षीचे पेपर्स बघायला मिळतील. तसंच यामुळे तुम्हाला परीक्षेत चांगले मार्क्स मिळवण्यात मदत होईल.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात