मुंबई, 05 मे: NEET UG 2023 परीक्षा येत्या 07 मे 2023 ला होणार आहे. या परीक्षेचे प्रवेशपत्र नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जारी केले आहे. या परीक्षेसाठी अर्ज करणारे उमेदवार NTA NEET UG 2023 च्या अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in वर जाऊन प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. पण ही परीक्षा क्रॅक करायची असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मॉक टेस्ट आणि रिव्हिजन. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला NEET UG 2023 परीक्षेसाठी मॉक टेस्ट आणि रिव्हिजन करण्यासाठी लिंक देणार आहोत ज्यामुळे तुम्ही परीक्षा क्रॅक करू शकाल. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने NEET UG परीक्षेसाठी अधिसूचना जारी केल्यानंतर 06 मार्च 2023 पासून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली. यामध्ये अर्ज करण्यासाठी 06 एप्रिल 2023 पर्यंत मुदत देण्यात आली होती. परीक्षेचे हॉल तिकीट काढण्यात आले आहे. MHT CET 2023: परीक्षेला अवघे काही दिवस शिल्लक; ‘ही’ मॉक टेस्ट द्याल तर परीक्षेत याल टॉपर केंद्रावर होणार्या सर्व औपचारिकता दरम्यान, तुम्हाला परीक्षेसाठी उशीर होऊ नये, म्हणून पेपर सुरू होण्यापूर्वी किमान 45 मिनिटे आधी केंद्रावर पोहोचण्याचा सल्ला देण्यात आला आहे. परीक्षा दुपारी 2 ते 5.20 पर्यंत म्हणजेच एकूण तीन तास 20 मिनिटे होणार आहे. विद्यार्थी दुपारी 1.15 वाजल्यापासूनच त्यांची जागा घेऊ शकतात आणि 1.30 नंतर कोणालाही सभागृहात प्रवेश दिला जाणार नाही. IIT Placements: IIT कॉलेजमधून ‘हा’ कोर्स केलात तर मिळेल करोडोंचं पॅकेज; क्षणात लाईफ होईल सेट 1.30 ते 1.45 या वेळेत परीक्षेशी संबंधित महत्त्वाच्या घोषणा होतील आणि 1.45 वाजता प्रश्नपत्रिका दिली जाईल. दुपारी 1.50 ते 2 या वेळेत उमेदवारांना त्यांचे आवश्यक तपशील पुस्तिकेत भरावे लागतील. दुपारी ठीक 2 वाजता पेपर सुरू होईल आणि संध्याकाळी 5.20 पर्यंत चालेल. या परीक्षेसाठी Topper Learning कडून मॉक टेस्ट जारी करण्यात आल्या आहेत. परीक्षेला अवघे काही दिवस शिल्लक असताना या मॉक टेस्ट दिल्यामुळे तुम्हला चांगले मार्क्स मिळू शकतात. मॉक टेस्ट देण्यासाठी इथे क्लिक करा.
ही कागदपत्रे सोबत घ्या NEET परीक्षेला जाताना, तुमच्या प्रवेशपत्राव्यतिरिक्त, तुम्ही या गोष्टीही सोबत घेतल्या पाहिजेत. हजेरी पत्रकावर एक पासपोर्ट आकाराचा फोटो सोबत जोडणे आवश्यक आहे. वैध आणि मूळ फोटो आयडी पुरावा जसे की आधार कार्ड, मतदार I कार्ड, पासपोर्ट इ. PWD प्रमाणपत्र देखील लागू असल्यास. एक पोस्टकार्ड आकाराचा (4"x6") पांढरा पार्श्वभूमी असलेला रंगीत फोटो प्रोफॉर्मासोबत जोडला जावा जो प्रवेशपत्रासह डाउनलोड केला जाईल. हे केंद्रातील निरीक्षकाला द्यावे लागेल.