मुंबई, 05 मे: MHT CET 2023 परीक्षा येत्या काही दिवसात घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेल, महाराष्ट्र यांनी MHT CET 2023 चे प्रवेशपत्र जारी केलं आहे. परीक्षेसाठी नोंदणी केलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वरून ते डाउनलोड करू शकतात. MAH CET 2023 हॉल तिकीट PCM गटासाठी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित) जारी करण्यात आले आहे. आज आम्ही तुम्हाला याच परीक्षेसाठी मॉक टेस्टची लिंक देणार आहोत. ज्याद्वारे तुम्ही मॉक टेस्ट देऊ शकाल आणि पेपर क्रॅक करू शकाल. यंदा CET सेल 9 मे ते 13 मे 2023 दरम्यान PCM गटासाठी MHT CET 2023 आयोजित करेल. पीसीएम गटासाठी एमएएच सीईटी 2023 दोन शिफ्टमध्ये घेण्यात येईल. पहिली शिफ्ट सकाळी 9 ते दुपारी 12, तर दुसरी शिफ्ट दुपारी 2 ते 5 अशी असेल. सीईटी सेल महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील विविध परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेईल. IIT Placements: IIT कॉलेजमधून ‘हा’ कोर्स केलात तर मिळेल करोडोंचं पॅकेज; क्षणात लाईफ होईल सेट असं डाउनलोड करा तुमचं प्रवेशपत्र सर्व प्रथम अधिकृत वेबसाइटला भेट द्या - cetcell.mahacet.org. MHT CET 2023 विभागावर क्लिक करा. प्रवेशपत्रासाठी लिंक उघडा. तपशील प्रविष्ट करून लॉग इन करा. तुमचे MHT CET प्रवेशपत्र डाउनलोड करा. परीक्षेच्या दिवसासाठी प्रिंटआउट घ्या. मोठी बातमी! CBSE परीक्षेत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; बोर्डानं या नियमात केला बदल या परीक्षेसाठी Topper Learning कडून मॉक टेस्ट जारी करण्यात आल्या आहेत. परीक्षेला अवघे काही दिवस शिल्लक असताना या मॉक टेस्ट दिल्यामुळे तुम्हला चांगले मार्क्स मिळू शकतात. मॉक टेस्ट देण्यासाठी इथे क्लिक करा. MHT CET चे दोन पेपर एमएचटी सीईटीचे दोन पेपर असतील. एक गणितासाठी आणि दुसरा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रासाठी. प्रत्येक पेपर 100 गुणांचा असेल. विद्यार्थ्यांना गणिताच्या पेपरमध्ये 50 प्रश्न मिळतील त्यापैकी 10 प्रश्न इयत्ता अकरावीचे आणि 40 प्रश्न बारावीचे असतील. पेपर II मध्ये भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राचे प्रत्येकी 50 प्रश्न, इयत्ता 11 मधील 10 प्रश्न आणि इयत्ता 12 मधील दोन्ही विषयांचे 40 प्रश्न असतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.