जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / NEET PG: निकालाबाबत समोर आली मोठी अपडेट; 'या' तारखेला जारी होणार Answer Key

NEET PG: निकालाबाबत समोर आली मोठी अपडेट; 'या' तारखेला जारी होणार Answer Key

निकालाबाबत समोर आली मोठी अपडेट

निकालाबाबत समोर आली मोठी अपडेट

देशभरातील विविध शहरांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली. ज्यामध्ये सुमारे 2.9 लाख उमेदवारांनी हजेरी लावली. सध्या परीक्षार्थी परीक्षेच्या उत्तर कीच्या प्रतीक्षेत आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 10 मार्च : NEET PG परीक्षा दिलेल्या उमेदवारांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. परीक्षेचा निकाल कधी जारी होणार त्याबाबतची तारीख जाहीर झाली आहे. नॅशनल बोर्ड ऑफ मेडिकल सायन्स एक्झामिनेशन, NBEMS द्वारे NEET PG परीक्षा 5 मार्च 2023 रोजी घेण्यात आली. देशभरातील विविध शहरांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली. ज्यामध्ये सुमारे 2.9 लाख उमेदवारांनी हजेरी लावली. सध्या परीक्षार्थी परीक्षेच्या उत्तर कीच्या प्रतीक्षेत आहेत. NEET PG परीक्षेच्या वेळापत्रकानुसार त्याचा निकाल 31 मार्च रोजी जाहीर होणार आहे. यासाठी सुमारे तीन आठवडे शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत बोर्ड परीक्षेची आन्सर की लवकरात लवकर प्रसिद्ध करेल. प्रथम तात्पुरती उत्तर की जारी केली जाईल, ज्यावर प्राप्त झालेल्या आक्षेपांच्या आधारे अंतिम आन्सर की आणि निकाल जाहीर केले जातील. Government Jobs: तब्बल 1,42,000 रुपये पगार अन् थेट रेल्वे मंत्रालयात नोकरी; तुम्ही आहात का पात्र? करा चेक उमेदवार अधिकृत वेबसाइट natboard.edu.in वर जाऊन NEET PG ची अन्सार की डाउनलोड करू शकतील. मुख्यपृष्ठावर आन्सर की लिंक उपलब्ध असेल. यासोबतच ऑनलाइन पद्धतीनेही हरकती नोंदवता येतील. अशा पद्धतीनं डाउनलोड करा Answer Key NBEMS च्या अधिकृत वेबसाइट natboard.edu.in वर जा होम पेजवर उपलब्ध असलेल्या NEET PG 2023 Answer Key लिंकवर क्लिक करा NEET PG 2023 उत्तर की PDF फॉरमॅटमध्ये दिसेल. पीडीएफ फाइल तपासा, जतन करा आणि डाउनलोड करा भविष्यातील संदर्भासाठी फाइलची हार्ड कॉपी ठेवा.

News18लोकमत
News18लोकमत

पदव्युत्तर पदवीसाठी राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा ही भारतातील विविध पदव्युत्तर डॉक्टर ऑफ मेडिसिन (MD), मास्टर ऑफ सर्जरी (MS) आणि देशातील सरकारी किंवा खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये डिप्लोमा प्रोग्राममध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी पात्रता आणि क्रमवारी परीक्षा आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात