मुंबई, 12 ऑगस्ट: राज्यात महाराष्ट्र CET (Maharashtra CET 2021) साठी रजिस्ट्रेशन परत सुरु करण्यात आलं आहे. पदवी (Degree), पदव्युत्तर (PG) आणि प्रोफेशनल कार्यक्रमासाठी (Professional Courses) अर्ज करू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना mahacet.org वर MAHACET च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी आणि अर्ज भरावा. नवीन अर्जदारांव्यतिरिक्त, जे उमेदवार पूर्वी MHT CET नोंदणी पूर्ण करू शकले नाहीत ते cetcell.mahacet.org द्वारे अर्ज भरू शकतात.
MAHACET साठी रजिस्ट्रेशन प्रोसेस आजपासून सुरु झाले आहेत. विंडो 12 ते 16 ऑगस्ट दरम्यान खुली राहणार आहे. MHT CET फॉर्ममध्ये करेक्शन केले जाऊ शकतात. म्हणून फॉर्ममध्ये दुरुस्ती करायची आहे तर 14 ते 16 ऑगस्ट दरम्यान फॉर्ममध्ये करेक्शन केलं जाऊ शकतं.
हे वाचा - या कॉलेजमध्ये मिळतं श्रीमंतांच्या मुलांचं संगोपन करण्याचं शिक्षण; कोट्यवधी पॅकेज
उच्च शिक्षण मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सायन्स (Science), कॉमर्स (Commerce) आणि आर्ट्स (Arts) या शाखांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी CET परीक्षा यंदा घेण्यात येणार नाही. मात्र व्यावसायिक अभ्यासक्रम, मॅनेजमेंट अभ्यासक्रम आणि लॉ अशा अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणारया विद्यार्थ्यांना CET देणं अनिवार्य असणार आहे. MHCET परीक्षा 26 ऑगस्टला घेतली जाणार आहे.
बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट (Bachelor of Hotel Management), मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट (Master of Hotel Management), बी एड(B.Ed.), एम बी ए (MBA), एम सी एम (MCM), आर्किटेक्चर (B.Arch.) ,लॉ (LLB) या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना CET म्हणजेच प्रवेश परीक्षा द्यावी लागणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entrance exam, Maharashtra