मुंबई, 03 जून: देशात रोजगाराबाबत (Employment rate in India) चांगली बातमी आहे. देशात नोकऱ्यांची मागणी वाढू लागली आहे. मे 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये जॉब मार्केटमध्ये मोठी वाढ (Increase in job market in 2022) झाली आहे. मे 2022 मध्ये देशातील विविध क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये (Different jobs in all Sectors) तब्बल 40 टक्के वाढ झाली आहे. Naukri.com ने आपल्या सर्वेक्षणात (Naukri Survey) ही माहिती दिली आहे. कोरोनामुळे प्रभावित झालेल्या पर्यटन क्षेत्रात तेजी आली आहे. तसंच रिटेल क्षेत्रातही नोकऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. एलॉन मस्कच्या कंपनीत 10% कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता; नवीन भरतीही नाही; Tesla मध्ये नेमकं चाललंय तरी काय? या क्षेत्रांमध्ये भरती वाढली मे 2021 च्या तुलनेत मे 2022 मध्ये अनेक क्षेत्रांमध्ये भरती प्रक्रियेत वाढ झाली आहे. विविध क्षेत्रात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांनाही संधी उपलब्ध झाली आहे. ज्या क्षेत्रांमध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली आहे ते म्हणजे म्हणजे पर्यटन आणि रुग्णालय क्षेत्रात 357% वाढ झाली आहे. तर रिअल इस्टेट क्षेत्रात 141 टक्के तर विमा क्षेत्रात 126% ची वाढ झाली आहे. दुसरीकडे BFSI क्षेत्रात 104%.टाकेन वाढ तर शिक्षण क्षेत्रात 86 टक्के वाढ झाली आहे. ऑटो क्षेत्रात 69 टक्के वाढ झाली आहे तर . तेल आणि वायूमध्ये 69 टक्के वाढ झाली आहे. आयटी आणि सॉफ्टवेअर क्षेत्रात 07 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या शहरांमध्ये वाढली जॉबची क्रेझ दिल्ली / एनसीआरच्या क्षेत्रात 63 टक्के वाढ दिसून आली आहे. मुंबई - 61 टक्के वाढ पुणे - 27 टक्के वाढ कलकत्ता - 59 टक्के वाढ चेन्नई - 35 टक्के वाढ हैदराबाद - 23 टक्के वाढ बंगळुरू -14 टक्के वाढ Engineer म्हणजे बेरोजगार हे आता विसरा; पुणे, मुंबई, नागपूरात जॉबच जॉब; 9 लाखांचं पॅकेजही; करा अर्ज अनुभवानुसार कोणाला आहेत संधी मे 2021 च्या तुलनेत मे 2022 मध्ये, नवीन ते तीन वर्षांच्या उमेदवारांची 61 टक्के मागणी आहे. त्याच वेळी, 4 ते 7 वर्षांचा अनुभव असलेल्यांसाठी 37 टक्के मागणी आहे. 8 ते 12 वर्षांचा अनुभव असलेल्यांना 22 टक्के मागणी आहे. तर 13 ते 16 वयोगटातील लोकांना 26 टक्के तर 16 वर्षांवरील 28 टक्के मागणी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.