मुंबई, 03 जून: कोविडनंतर संपूर्ण जगभरातील कर्मचाऱ्यांवर नोकरी जाण्याची टांगती तलवार आहे. मोठमोठ्या कंपन्यांमधूनही कर्मचाऱ्यांना राजीनामा द्यायला सांगितलं जात आहे. जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क (Elon Musk) यांच्या टेस्ला कंपनीमधील कर्मचाऱ्यांच्या नोकरीवरही गदा आली आहे. एलॉन मस्क (Elon Musk) यांच्या टेस्ला (Tesla) कंपनीतून आता 10% कर्मचारी कपात करावी लागणार असल्याचं कंपनीचे सीईओ मस्क यांनी सांगितलं आहे. इतकंच नाही तर टेस्लामध्ये आता नवीन कर्मचारी भरतीही काही काळ केली जाणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. याआधीही टेस्लामध्ये कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष ऑफिस जॉईन करा किंवा नोकरी सोडा असा इशारा देण्यात आला होता. आता त्यानंतर 10% कर्मचारी कपात होणार आहे. ‘या पुढील काही काळात अर्थव्यवस्थेची स्थिती फारशी चांगली राहणार नाही असं मला वाटत आहे,’ असं मस्क यांनी ऑफिसमध्ये पाठवलेल्या अंतर्गत ई-मेलमध्ये म्हटल्याचं रॉयटर्सनं (Reuters) आपल्या वृत्तात म्हटलं आहे. ‘कंपनीची जगभरातील नोकरभरती थांबवा’ (‘pause all hiring worldwide’) या हेडिंगखाली हा ईमेल गुरुवारी (2 जून 22) टेस्लाच्या सर्व अधिकाऱ्यांना (Tesla executives) पाठवण्यात आला आहे. Engineer म्हणजे बेरोजगार हे आता विसरा; पुणे, मुंबई, नागपूरात जॉबच जॉब; 9 लाखांचं पॅकेजही; करा अर्ज टेस्लाच्या (Tesla) कर्मचाऱ्यांनी तातडीनं ऑफिसमध्ये परतावं आणि ऑफिसमध्ये येऊन काम करावं किंवा नोकरी सोडावी, असं टेस्लाचे सीईओ मस्क (Tesla CEO Musk) यांनी कर्मचाऱ्यांना सांगितलं आहे. मस्क यांचा ईमेल ट्विटरवर व्हायरल (Elon musk email goes Viral) झाला आहे. ‘या पुढे टेस्लामध्ये (Tesla) वर्क फ्रॉम होम चालणार नाही,’ असं या ईमेलमध्ये म्हटलं होतं. अमेरिकेत आता कोविडची रुग्णसंख्या कमी होत आहे आणि ऑफिसेस पुन्हा सुरु झाली आहेत. या पार्श्वभूमीवर मस्क यांनी हे पाऊल उचललं आहे. “ज्यांना घरून काम करायचं आहे त्यांनी ऑफिसमध्ये येऊन दर आठवड्याला किमान (म्हणजे मला म्हणायचं आहे किमान) 40 तास तरी काम करणं आवश्यक आहे. हे शक्य नसेल तर त्यांनी टेस्ला कंपनी सोडावी आम्ही फॅक्टरी कर्मचाऱ्यांकडून ही किमान अपेक्षा करत आहोत. जर तुम्ही ऑफिसमध्ये दिसला नाहीत तर याचा अर्थ तुम्ही राजीनामा दिला आहे असं आम्ही समजू,” असं मस्क यांनी पाठवलेल्या ईमेलमध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे. सांगितलेल्या किमान तासांइतकं काम ऑफिसमध्ये येऊन करू न शकणारे जर कुणी अपवादात्मक कर्मचारी असतील तर मस्क स्वत: थेटून त्या कर्मचाऱ्यांच्या कामाचं पुनरावलोकन करतील आणि मगच मान्यता देतील. “जर ऑफिसमध्ये येऊन काम करणं कुणाला खरोखरंच अगदी अशक्यच असेल, तर मी त्याचा आढावा घेईन आणि अशा अपवादात्मक कर्मचाऱ्यांना मान्यता देईन,” असं सर्व जगात लीक झालेल्या या ईमेलमध्ये मस्क यांनी स्पष्टपणे लिहिलं आहे. “ऑफिस याचा अर्थ टेस्लाचे मुख्य ऑफिस, तुमच्या जॉबशी संबंधित नसलेलं कोणतीही अन्य शाखा चालणार नाही. उदाहरणार्थ- जर तुमचं काम फ्रेमॉन्ट फॅक्टरी ह्युमन रिलेशन्सशी (Fremont factory human relations) संबंधित असेल, पण तुमचं ऑफिस कुठे अन्यत्र असेल तर धन्यवाद, ” असं मस्क यांनी स्पष्टपणे लिहीलं आहे. तर मस्क यांनी दिलेल्या निर्वाणीच्या इशाऱ्याला जर कुणा कर्मचाऱ्यानं विरोध केला तर आपण त्या कर्मचाऱ्यासोबत असू असं बर्लिन-ब्रांडेनबर्ग, साशेन येथील IG Metall युनियनं म्हटलं आहे. या ठिकाणी टेस्लाचा प्लांट आहे. टेस्लाने जर्मनीत आतापर्यंत जवळपास 4000 कर्मचाऱ्यांना रोजगार दिला आहे. ही संख्या 12,000 पर्यंत वाढवण्याचा टेस्लाचा मानस आहे. “अशाप्रकारच्या एकतर्फी मागणीला जो कुणी विरोध करेल आणि त्याविरोधात उभा राहील, युनियन पूर्ण ताकदीनीशी कायद्यानुसार त्याला जर्मनीत साथ देईल, ” असं बर्लिन-ब्रांडेनबर्ग, साशेन येथील IG Metall युनियचे जिल्ह्यातील नेते बिर्गिट डाएत्झे यांनी म्हटलंय. एलॉन मस्क यांनी ट्विटर ही मायक्रोब्लॉगिंग साईट विकत घेतल्याची नुकतीच घोषणा केली होती; पण आता हे डील तात्पुरतं थांबवण्यात आलं आहे. स्पॅम आणि बनावट अकाउंटवरील प्रलंबित निर्णय असं कारण टेस्लाचे सीईओ मस्क यांनी यासाठी दिलं आहे. स्पॅम आणि बनावट ट्विटर वापरकर्त्यांची संख्या प्रत्यक्षातील एकूण वापरकर्त्यांच्या संख्येच्या तुलनेत 5 टक्क्यांनी कमी असल्याचे स्पष्ट होत नाही तोपर्यंत ट्विटरची डील सध्या रोखण्यात आली आहे. मात्र ट्विटर टेकओव्हर करण्याच्या डीलबाबत आपण वचनबद्ध असल्याचंही मस्क यांनी ट्विटच्या माध्यमातून स्पष्ट केलं आहे. एकाच वेळी अनेक जॉब ऑफर्स आल्यात? चिंता नको; एक करा Accept आणि इतर असे करा Reject आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये ट्विटरच्या व्यासपीठावर दररोज मॉनेटायजेबल असणाऱ्या खात्यांची माहिती गेल्या महिन्यात ट्विटरने प्रसिद्ध केली होती. यामध्ये 5 टक्क्यांपेक्षा कमी खाती बनावट किंवा स्पॅम असल्याचं सांगण्यात आलं होतं. “ट्विटरचे सध्या जगभरात 229 मिलियन युजर्स आहेत ज्यांनी पहिल्या तिमाहीत जाहिराती बघितल्या असतील, असं रॉयटर्सनं आपल्या 2 मेच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. सर्वांत श्रीमंत व्यक्ती असलेल्या मस्क यांनी एप्रिल महिन्यात 44 बिलियन डॉलर्सना ट्विटर कंपनी विकत घेतली. विकत घेण्याच्या करारावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर ट्विटरमध्ये अनेक बदल करण्याचं वचन मस्क यांनी दिलं आहे. त्यात ट्विटरवरील स्पॅम अकाउंट्स काढून टाकण्याला प्राधान्य दिलं जाणार आहे. आता मस्क यांच्या टेस्लाबाबतच्या या निर्णयावर जगभरातून काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.