मुंबई, 15 मे: पोलीस दलात वरिष्ठ पदावर नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना आता नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (एनआयए) अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेमध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. पोलीस उपअधीक्षक पदासाठीच्या 10 जागांवर ही भरती होणार आहे. ‘स्टडीकॅफे’ने त्याबाबत माहिी देणारं वृत्त दिलं आहे. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीमध्ये (NIA) पोलीस उपअधीक्षक पदासाठी भरती होत आहे. एनआयएच्या अधिकृत अधिसूचनेनुसार, पोलीस उपअधीक्षक पदासाठी एकूण 10 जागा आहेत. त्यासाठी निवड झालेल्या उमेदवाराला वेतन श्रेणीच्या 10व्या पातळीनुसार म्हणजे 56,100 रुपये ते 1,77,500 रुपये इतकं दरमहा वेतन दिलं जाईल. पदासाठी अर्ज करण्याची कमाल वयोमर्यादा अर्ज प्राप्त होण्याच्या शेवटच्या तारखेनुसार 56 वर्षं आहे.
केंद्र किंवा सरकारच्या त्याच किंवा इतर संस्था विभागात या नियुक्तीच्या आधी झालेल्या लगेचच्या दुसर्या माजी संवर्गीय पदावरच्या प्रतिनियुक्तीच्या कालावधीसह प्रतिनियुक्तीचा कालावधी सामान्यतः 3 वर्षांपेक्षा जास्त नसावा. इच्छुक आणि पात्र उमेदवार सर्व संबंधित कागदपत्रांसह अर्जाची हार्ड कॉपी एसपी (Adm), एनआयए एचक्यू, सीजीओ कॉम्प्लेक्स समोर, लोधी रोड, नवी दिल्ली 110003 या पत्त्यावर पाठवू शकतात. जॉबसाठी एकही परीक्षा नाही थेट होणार मुलाखत, मुंबई विमानतळ इथे तब्बल 480 जागांसाठी भरतीची घोषणा एनआयएच्या अधिसूचनेनुसार, पोलीस उपअधीक्षक या पदाच्या एकूण 10 जागांपैकी 3 जागा प्रतिनियुक्ती/Absorption absorption बेसिसवर असतील, तर 7 जागा प्रतिनियुक्ती तत्त्वावर असतील. तीन जागांसाठी वेतनश्रेणीच्या 10 व्या पातळीनुसार 56100-1,77,500 रुपये इतकं वेतन असेल. इतर 7 जागांसाठी पे बँड 3 नुसार ग्रेड पेच्या 5400 रुपयांसह 15,600-39,100 रुपये इतकं वेतन असेल. ही नियुक्ती देशभरात कुठेही केली जाऊ शकते. एनआयएमधल्या या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे खालील पात्रता असणं आवश्यक आहे.] BMC MGCM Recruitment: महिन्याचा तब्बल 1,00,000 रुपये पगार; मुंबई महापालिकेत ‘या’ पदांसाठी ओपनिंग्स; असा करा अर्ज केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा केंद्रशासित प्रदेशांच्या अधिकाऱ्यांसाठी - A - i- नियमित स्तरावर मूळ संवर्ग किंवा विभागात समान पद धारण करणं किंवा ii- पे बँड 2मधल्या (9300 रुपये-34800 रुपये) पदावर नियमितपणे नियुक्ती झाल्यानंतर प्रदान केलेल्या ग्रेडमध्ये 2 वर्षांच्या सेवेसह 4800 रुपये किंवा मूळ संवर्ग/विभागातलं समतुल्य वेतन किंवा iii- पे बँड 2मधल्या (9300 रुपये-34800 रुपये) पदावर नियमितपणे नियुक्ती झाल्यानंतर प्रदान केलेल्या ग्रेडमध्ये 3 वर्षांच्या सेवेसह 4600 रुपयांच्या ग्रेड पेसह किंवा मूळ संवर्ग/विभागातलं समतुल्य वेतन आणि B – अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालीलप्रमाणे शैक्षणिक पात्रता आणि अनुभव असावा. SSC CHSL Recruitment: 12वी पास उमेदवारांसाठी तब्बल 1600 जागांसाठी भरतीची घोषणा; लगेच करा अप्लाय i - मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतली पदवी ii - गुन्हेगारी प्रकरणांच्या तपास करण्याचा किंवा दहशतवादविरोधी ऑपरेशन किंवा दहशतवादविरोधी प्रशिक्षण देण्यासह गुप्तचर कार्य हाताळण्याचा तीन वर्षांचा अनुभव असावा. या पदासाठी उमेदवार एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीच्या दिनांकापासून (9/5/23) 2 महिन्यांच्या आत अर्ज करू शकतात.