मुंबई, 20 एप्रिल: राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एनडीएमए) ही भारत सरकारची, आपत्ती व्यवस्थापनासाठी धोरणं तयार करणारी सर्वोच्च संस्था आहे. आपत्ती व्यवस्थापनाचा सर्वांगीण दृष्टीकोन सुनिश्चित करण्याची, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणासोबत (एसडीएमए) समन्वय साधणारी धोरणं तयार करण्याची जबाबदारी या संस्थेवर असते. एकूणच काय तर देशातील कोणत्याही नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीच्या काळात एनडीएमएला सर्वात पुढे राहून काम करावं लागतं. त्यासाठी संस्थेला पुरेशा मनुष्यबळाची गरज भासते. आताही एनडीएमएला प्रतिनियुक्तीच्या आधारावर ड्युटी ऑफिसर (ऑपरेशन सेंटर) या पदाची एक रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवाराची गरज आहे. ‘स्टडी कॅफे’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. एनडीएमए 2023 भरती अधिसूचनेनुसार, नियुक्ती मिळालेल्या उमेदवाराला लेव्हल-11नुसार 67 हजार 700 ते 2 दोन लाख 8 हजार 700 रुपयांपर्यंत मासिक वेतन मिळेल. या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार 56 वर्षांपेक्षा जास्त वयाचा नसावा. इच्छुक उमेदवारांनी सर्व संबंधित कागदपत्रे आणि ग्रेड पेसह एनडीएमए वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या विहित प्रोफार्मामध्ये अर्ज भरून तो जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 45 दिवसांच्या आत, अंडर सेक्रेटरी (प्रशासन), राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, एनडीएमए भवन, ए-1, सफदरजंग एन्क्लेव्ह, नवी दिल्ली-110029 येथे पाठवावा. मोठी खूशखबर! आता परदेशात शिक्षणाचं स्वप्न होणार पूर्ण; इथे मिळतेय तब्बल 60 लाखांची स्कॉलरशिप पोस्ट आणि संख्या: एनडीएमए 2023 भरती अधिसूचनेनुसार, एनडीएमएला प्रतिनियुक्तीच्या आधारावर ड्युटी ऑफिसर (ऑपरेशन सेंटर) या पदाची एक रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवाराची गरज आहे. पात्रता: केंद्र सरकार, संरक्षण दल किंवा केंद्रीय पोलीस दलातील अधिकारी ज्यांना सरकार किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये सेवा देण्याचा पाच वर्षांचा अनुभव आहे, अशा व्यक्ती या पदासाठी अर्ज करू शकतात. a)(i) पेरेंट केडर किंवा विभागात कायमस्वरुपी समतुल्य नियुक्ती असलेली व्यक्ती अर्ज करू शकते. 75,000 रुपये पगार आणि कोणतीच परीक्षा नाही; ‘या’ महापालिकेत थेट मिळणार नोकरी; ही घ्या मुलाखतीची तारीख किंवा समतुल्य पे मॅट्रिक्स किंवा समतुल्य स्तर 9 वर पाच वर्षांच्या सेवेसह, सध्याच्या केडर किंवा विभागामध्ये नियमित नियुक्ती मिळालेली असावी. b) इच्छुक उमेदवारानं विज्ञान किंवा अर्थशास्त्र, स्टॅटिस्टिक्स, डिफेन्स स्टडीज, कॉमर्स किंवा बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन या विषयातील पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानाची पदवी किंवा समकक्ष पदवी मिळवलेली असावी. वयोमर्यादा: एनडीएमए 2023 भरती अधिसूचनेनुसार, ड्युटी ऑफिसर (ऑपरेशन सेंटर) या पदसाठी अर्ज करणारी व्यक्ती 56 वर्षांपेक्षा लहान असावी. COAL India मध्ये सल्लागार होण्याची संधी; महिन्याला मिळेल एक लाखांपेक्षा जास्त सॅलरी वेतन: नियुक्ती मिळालेल्या उमेदवाराला लेव्हल-11नुसार 67 हजार 700 ते 2 दोन लाख 8 हजार 700 रुपयांपर्यंत मासिक वेतन मिळेल. अनुभव: इच्छुक उमेदवारांना संरक्षण दल, केंद्रीय पोलीस दल, पोलीस किंवा टेलिकम्युनिकेशन क्षेत्रात पाच वर्षांचा प्रशासकीय आणि ऑपरेशनल कामाचा अनुभव असणं गरजेचं आहे.
अर्ज कसा करावा? इच्छुक उमेदवारांनी सर्व संबंधित कागदपत्रं आणि ग्रेड पेसह एनडीएमए वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या विहित प्रोफार्मामध्ये अर्ज भरून तो जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 45 दिवसांच्या आत, अंडर सेक्रेटरी (प्रशासन), राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, एनडीएमए भवन, ए-1, सफदरजंग एन्क्लेव्ह, नवी दिल्ली-110029 येथे पाठवावा.