नवी दिल्ली, 19 एप्रिल : कोल इंडिया लिमिटेड (सीआयएल) ही भारतातील एक सरकारी कंपनी आहे. कोल इंडिया जगातील सर्वांत मोठी कोळसा उत्पादक कंपनी असून भारतामधील सुमारे 82 टक्के कोळसा कोल इंडियामार्फत पुरवला जातो. सध्या कोल इंडियाच्या मालकीच्या 450 खाणी आहेत. कामाचा हा पसारा व्यवस्थित हाताळण्यासाठी कंपनीला मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची गरज भासते. आताही कोल इंडिया लिमिडेटचे मुख्य व्यवस्थापक/ विभागाचे प्रमुख (ईई) यांनी कंपनीच्या कोलकाता येथील तांत्रिक सचिवालयात पूर्ण-वेळ सल्लागार पदाच्या भरतीसाठी अधिसूचना काढली आहे. 12 एप्रिल 2023 रोजी ही अधिसूचना काढण्यात आली आहे. ‘स्टडी कॅफे’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. सीआयएल आणि त्याच्या सब्सिडरीज, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या, केंद्र आणि राज्य सरकारांच्या ऑटोनॉमस संस्था अशा कुठल्याही संस्थेमधून 30 एप्रिल 2023 पर्यंत जनरल मॅनेजर एक्झिक्युटिव्ह ऑफ मायनिंग ई8 ग्रेड या पदावरून निवृत्त होणारी व्यक्ती किंवा निवृत्त झालेली अनुभवी व्यक्ती सल्लागाराच्या पदासाठी अर्ज करू शकते. एका वर्षाच्या कालावधीसाठी ही नियुक्ती असेल. इच्छुकांनी विहित नमुन्यातील अर्ज 26 एप्रिल 2023 पूर्वी जमा करावेत. पोस्ट आणि रिक्त जागा : सीआयएल 2023 भरती अधिसूचनेनुसार, कोलकाता येथे एका वर्षाच्या पोस्टिंग कालावधीसह तांत्रिक सचिवालयात पूर्ण-वेळ सल्लागार म्हणून एक जागा भरली जाणार आहे. मासिक मानधन : सीआयएल 2023 भरती अधिसूचनेनुसार पूर्ण-वेळ सल्लागाराला मासिक एक लाख पाच हजार रुपये मानधन दिलं जाईल. वयोमर्यादा : कराराच्या कालावधीमध्ये उमेदवाराचं वय 65 वर्षांपेक्षा जास्त नसावं. शैक्षणिक पात्रता : इच्छुक उमेदवाराकडे बी.टेक (मायनिंग) ही पदवी आणि प्रथम श्रेणी खाणकाम क्षमता प्रमाणपत्र (एमसीसी) असणं गरजेचं आहे. अतिरिक्त पात्रता : इच्छुक उमेदवाराकडे एम. टेक पदवी असल्यास त्याला जास्त प्राधान्य दिलं जाईल. कामाचा अनुभव : सेवानिवृत्तीपूर्वीच्या शेवटच्या 15 वर्षांच्या सेवेदरम्यान सचिवालयात बोर्ड स्तरावरील काम करण्याचा 10 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असला पाहिजे. निवड प्रक्रिया : अर्ज केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट केलं जाईल. मुलाखतीत निवडलेल्या उमेदवाराची निवडीच्या तारखेपासून एका वर्षासाठी सल्लागार म्हणून नियुक्त केलं जाईल. अर्ज कसा करावा? सीआयएल 2023 भरती अधिसूचनेनुसार, या पदासाठी इच्छुक असलेल्या पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रं आणि प्रशस्तिपत्रांसह पूर्ण झालेला अर्ज 26 एप्रिल 2023 पर्यंत ईमेल/नोंदणीकृत पोस्टाद्वारे पाठवावा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.