मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Myntra Recruitment: प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनी Myntra मध्ये फ्रेशर्ससाठी नोकरीची संधी; वाचा संपूर्ण डिटेल्स

Myntra Recruitment: प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनी Myntra मध्ये फ्रेशर्ससाठी नोकरीची संधी; वाचा संपूर्ण डिटेल्स

यासाठी नेमकी काय पात्रता आवश्यक (Eligibility for Myntra jobs) असणार आहे? याबाबत माहिती जाणून घेऊया.

यासाठी नेमकी काय पात्रता आवश्यक (Eligibility for Myntra jobs) असणार आहे? याबाबत माहिती जाणून घेऊया.

यासाठी नेमकी काय पात्रता आवश्यक (Eligibility for Myntra jobs) असणार आहे? याबाबत माहिती जाणून घेऊया.

बंगलोर, 13 ऑक्टोबर: डोक्याच्या क्लिप्सपासून तर अगदी पायातील चपलांपर्यंत आपल्या गरजेचं प्रत्येक सामान ऑनलाईन विकणारी कंपनी Myntra (e-commerce company Myntra) मध्ये आता फ्रेशर्ससाठी मोठी नोकरची संधी (Jobs in Myntra for freshers) उपलब्ध होणार आहे. ही कंपनी सध्या काही भाषेवर प्रभुत्व असलेल्या फ्रेशर्स आणि प्रोफेशनल उमेदवारांच्या शोधात आहे. विशेष म्हणजे ही कंपनी यासाठी कोणत्याही क्षेत्रातील ग्रॅज्युएट (Graduate jobs in Myntra) उमेदवारांना नॊक्ररीची संधी देणार आहे. ही भरती (Myntra Recruitment 2021) नक्की कशी होणार आहे? कोणत्या पदासाठी होणार आहे? आणि यासाठी नेमकी काय पात्रता आवश्यक (Eligibility for Myntra jobs) असणार आहे? याबाबत माहिती जाणून घेऊया.

या पदांसाठी असेल भरती

कम्युनिकेशन कोच (Communication Coach)

शैक्षणिक पात्रता

यासाठी उमेदवरांना कोणत्याही क्षेत्रातून पदवीपर्यंत शिक्षण घेणं आवश्यक असणार आहे.

तसंच ज्या उमेदवारांकडे इंग्रजीमध्ये ग्रॅज्युएट डिग्री आहे अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

इंग्रजीमध्ये कम्युनिकेशन उत्तम असणं आवश्यक आहे. तसंच लिखाणही चांगलं असणं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना कोचिंग आणि सॉफ्ट स्किल्स शिकवण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे.

हिंदीमध्ये कम्युनिकेशन स्किल चांगलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांकडे सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची क्षमता असणं आवश्यक आहे.

सॉफ्ट स्किल ट्रेनिंगमध्ये सर्टिफिकेट असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

हे वाचा- 2021 संपेपर्यंत तब्बल 10 लाख IT कर्मचारी सोडणार जॉब्स? Attrition Rate मध्ये वाढ

ही असेल जबाबदारी

एस्केलेशन डेस्क आणि इनबाउंड समाविष्ट असलेल्या Myntra च्या  व्हॉईस चॅनेलसाठी फ्रेमवर्क तयार करणे.

प्रशिक्षण आणि कोचिंगचं प्लॅनिंग तयार करून एस्केलेशन सुपरवायझर्स आणि इनबाउंड एजंट्सना ट्रेनिंग देणे.

वेळोवेळी मिळालेल्या डेटामधून ट्रेनिंगसाठी प्लॅन करत ट्रेनिंग ठरवणे.

ज्या विषयांवर गरज असेल त्या विषयांना ओळखून त्यावर ट्रेनिंग तयार करणे.

HR जेव्हा कोणत्याही उमेदवारांची निवड करत असेल तेव्हा त्यांना उमेदवारांच्या निवडीची पद्धत सुचवणे.

अशा पद्धतीनं करा अप्लाय

सुरुवातीला अधिकृत साइट myntra.com ला ओपन करा.

यानंतर तुम्हाला होमपेज दिसेल.

यानंतर खाली स्क्रोल करा. इथे तुम्हाला डाव्या बाजूला  career टॅब दिसेल.

त्यावर क्लिक करा.

यानंतर जे पेज उघडेल त्यात Explore Careerबटण दिसेल त्यावर क्लिक करा.

इथे उमेदवार  Myntra Jobs for Communication Coach Role जॉब्स शोधू शकतात

दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण माहिती काळजीपूर्वक तपासा आणि जर इच्छुक मिंत्रा पात्रता निकषावर समाधानी असतील तर ते अर्ज बटणावर क्लिक करू शकतात.

यानंतर Submit वर क्लीक करा.

हे वाचा- मोठी बातमी! TCS 2022च्या आर्थिक वर्षामध्ये तब्बल 77,000 फ्रेशर्सना देणार नोकरी

Myntra कंपनीतील पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:
top videos