मराठी बातम्या /बातम्या /करिअर /JOB ALERT: ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी; 'या' मंत्रालयात लाखो रुपये सॅलरीचा जॉब

JOB ALERT: ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी; 'या' मंत्रालयात लाखो रुपये सॅलरीचा जॉब

मिळेल लाखो रुपये पगार

मिळेल लाखो रुपये पगार

निवडलेल्या उमेदवाराला लेव्हल-13 नुसार, 1 लाख 23 हजार 100 ते 2 लाख 15 हजार 900 रुपयांपर्यंत मासिक वेतन दिलं जाईल.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 12 मार्च:  देशातील तरुणांना रोजगार मिळावा या साठी कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय (एमएसडीई) सातत्यानं प्रयत्नशील आहे. त्यासाठी मंत्रालयाच्या वतीनं विविध उपक्रम, कार्यशाळा आणि योजना राबवल्या जात आहेत. या सर्व कामाचं योग्य व्यवस्थापन करण्यासाठी आणि त्यावर योग्य नियंत्रण ठेवण्यासाठी मंत्रालयाला सध्या एका संचालकाची गरज आहे. त्यामुळे एमएसडीई संचालक पदासाठी पात्र उमेदवार शोधत आहे. एमएसडीई 2023 भरतीच्या अधिकृत अधिसूचनेनुसार, मंत्रालयामध्ये संचालकपदाची एक जागा रिक्त आहे. या पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला 1 लाख 23 हजार 100 ते 2 लाख 15 हजार 900 रुपयांपर्यंत मासिक वेतन दिलं जाईल. 'स्टडी कॅफे'नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

पोस्टचं नाव आणि संख्या: कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, संचालकपदासाठी फक्त एक जागा रिक्त आहे.

वयोमर्यादा: अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत या पदासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तीचं कमाल वय 56 वर्षांपेक्षा जास्त नसलं पाहिजे.

Career Tips: CBI मध्ये अधिकारी होण्यासाठी पात्रता असते तरी काय? किती मिळतो पगार? संपूर्ण माहिती

पे स्केल: निवडलेल्या उमेदवाराला लेव्हल-13 नुसार, 1 लाख 23 हजार 100 ते 2 लाख 15 हजार 900 रुपयांपर्यंत मासिक वेतन दिलं जाईल.

नोकरीचं ठिकाण आणि कार्यकाळ: निवडलेल्या उमेदवाराची सुरुवातीला एका वर्षाच्या कालावधीसाठी दिल्ली येथे नियुक्ती केली जाईल. एनसीव्हीईटीच्या नियम आणि आवश्यकतांनुसार हा कार्यकाळ नंतर वाढवला जाऊ शकतो.

पात्रता निकष: कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या 2023 च्या अधिसूचनेनुसार, संचालकपदासाठी खालील पात्रता निकष आवश्यक आहेत:

1. अभियांत्रिकी/तंत्रज्ञान/कायदा/अर्थशास्त्र/वाणिज्य/बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन विथ फायनान्स अँड अकाउंट्स/सीए/सीएस/कॉस्ट अकाउंटंट, एमबीए किंवा निवड समितीद्वारे उपयुक्त मानली जाणारी कोणतीही समकक्ष अंडर ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट आवश्यक.

PMC Recruitment: 10वी असो की ग्रॅज्युएट पुणे महापालिकेत तब्बल 320 जागांसाठी मोठी पदभरती; इतका मिळेल पगार

2. कौशल्य/प्रशिक्षण/व्यावसायिक शिक्षणाचा अनुभव किंवा स्कील इको-सिस्टमचं ज्ञान आवश्यक.

3. ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट किंवा अॅडमिनिस्ट्रेशन आणि वित्त क्षेत्रातील अनुभव आवश्यक.

4. लिखित आणि मौखिक स्वरुपात उत्तम कम्युनिकेशन आणि प्रेझेंटेशन स्कील्स असणं गरजेचं आहे. सोबत कॉम्प्युटरवर काम करण्याचं ज्ञान असणं आवश्यक आहे.

5. भारतात सध्या सुरू असलेल्या इको सिस्टिमचं रूपांतर कौशल्याधारित रचनेत करण्याच्या सुरू असलेल्या कार्यात सहभागी असलेल्या टीममध्ये काम करण्याची इच्छा असलेले उत्साही, कौशल्यवान, संधोशनशील, आणि चैतन्याने भरलेले सरकारी अधिकारी पाहिजेत.

अर्ज कसा करावा: अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे इच्छुक उमेदवारांनी भरलेला अर्ज (परिशिष्ट-I) आवश्यक प्रमाणपत्रांच्या स्वयं-साक्षांकित प्रती जोडून उपसंचालक (प्रशासन), राष्ट्रीय परिषद यांना पाठवावा. 13 मार्च 2023 पूर्वी हा अर्ज व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण कौशल भवन, बी-2, पुसा रोड, करोल बाग, नवी दिल्ली - 110005 या पत्त्यावर पोहचला पाहिजे.

First published:
top videos

    Tags: Career, Career opportunities, Job Alert, Jobs Exams