मुंबई, 31 जुलै: कोरोनामुळे जगभरात सर्वांनाच आरोग्याचं महत्त्वं पटत चाललं आहे. कोरोनामुळे झालेली जीवितहानी, रुग्णालयातील रुग्णांचे होणारे हाल आणि इतर सर्वच गोष्टी या कधीच विसरू न शकणाऱ्या आहेत. या काळात डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफने केलेली रुग्णांची सेवा उल्लेखनीय आहे. त्यामुळेच मेडिकल आणि नर्सिंग क्षेत्रालाआजकालच्या काळात प्रचंड स्कोप आहे. विशेष करून महिला ज्या जॉबच्या शोधात असतील अशा महिलांसाठी नर्स म्हणून करिअरच्या (Career opportunity for women as Nurse) संधी आहेत. जर तुम्हीही नर्स (How to become Nurse) होऊ इच्छित असाल आणि याबद्दल शिक्षण कसं घेणार याबद्दल संभ्रमात असाल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला नर्सिंग क्षेत्रात करिअर (Career in Nursing) कसं करावं आणि त्यासाठी शिक्षण कसं घ्यावं याबद्दल माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. पात्रतेचे निकष या डिप्लोमामध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 50% गुण मिळवणे आवश्यक आहे. तसेच 10+2 मध्ये विज्ञान शाखेत प्रवेश असावा. तसंच या डिप्लोमामध्ये नावनोंदणी करण्यापूर्वी, तुमच्याकडे जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरीमध्ये किमान 2 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. ज्यांना जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरीचा कोणताही अनुभव नाही, ते भारतीय नर्सिंग कौन्सिलमधून किमान 6 ते 9 महिने नर्सिंगमध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम करू शकतात. ग्रॅज्युएट ते थेट अधिकारी होण्याचा प्रवास होईल शक्य; MPSC तर्फे ‘या’ पदांसाठी मोठी घोषणा; लगेच करा अर्ज किती असेल कॉलेजची फी जर तुम्हाला चांगल्या मान्यताप्राप्त महाविद्यालयातून नर्सिंगमध्ये डिप्लोमा करायचा असेल तर तुम्हाला ₹ 20000 ते 95000 पर्यंत वार्षिक शुल्क भरावे लागेल. डिप्लोमाचे शुल्कही कॉलेजमध्ये शिकवल्या जाणाऱ्या विषयानुसार असते. डिप्लोमानंतर इतका मिळेल पगार मुख्य नर्सिंग सेवा - 4 LPA नर्सिंग असिस्टंट- 2.5 LPA सामुदायिक आरोग्य परिचारिका- 3.5 LPA आपत्कालीन परिचारिका - 2 LPA नर्सिंग इन्चार्ज – 2 LPA नर्सिंग इन्चार्ज – 3 LPA
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.