Home /News /career /

MPSC Group C Exam: उमेदवारांनो, अर्ज करण्याची अजून एक संधी; लगेच असा करा अर्ज

MPSC Group C Exam: उमेदवारांनो, अर्ज करण्याची अजून एक संधी; लगेच असा करा अर्ज

 शेवटची तारीख आता वाढवून 31 जानेवारी 2022 पर्यंत करण्यात आली आहे.

शेवटची तारीख आता वाढवून 31 जानेवारी 2022 पर्यंत करण्यात आली आहे.

ही शेवटची संधी असणार आहे. MPSC Group C परीक्षेसाठी नोंदणी (Application link for MPSC Group C Exam) करण्याची शेवटची तारीख आता वाढवून 31 जानेवारी 2022 पर्यंत करण्यात आली आहे.

    मुंबई, 27 जानेवारी: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे लवकरच ग्रुप C परीक्षा (MPSC Group C Exam) घेतली जाणार आहे. यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) उद्योग निरीक्षक (MPSC Industry Inspector), उपनिरीक्षक (MPSC Sub Inspector), तांत्रिक सहाय्यक (Technical Asst), टेक्स सहाय्यक, लिपिक (MPSC Clerk). टंकलेखक या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. तसंच मराठी (Tax Assistant, Clerk-Typist, Marathi), लिपिक टंकलेखक इंग्रजी (Clerk-Typist, English). यासह इतर पदांसाठी रिक्त जागा काढण्यात आल्या आहेत. या पदभरसाठी होणाऱ्या परीक्षेसाठी अर्ज करण्याची सुरुवात 22 डिसेंबर 2021 रोजी करण्यात आली होती. अनेकांनी या परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. जर तुम्ही अजूनपर्यंत या परीक्षांसाठी नोंदणी (How to Apply for MPSC Group C Exam) केली नसेल तर तुमच्यासाठी ही शेवटची संधी असणार आहे. MPSC Group C परीक्षेसाठी नोंदणी (Application link for MPSC Group C Exam) करण्याची शेवटची तारीख आता वाढवून 31 जानेवारी 2022 पर्यंत करण्यात आली आहे. MPSC Group C अंतर्गत एकूण तब्बल 900 पदांची भरती केली जाणार आहे. अशा परिस्थितीत या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारा कोणताही उमेदवार या पदावर अर्ज करू शकतो. अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट mpsc.gov.in वर तपशीलवार सूचना वाचल्यानंतरच अर्ज करावा असं आयोगातर्फ सांगण्यात आलं आहे. Government Jobs: राज्यातील 'या' GMC मध्ये विविध पदांसाठी नोकरीची संधी काही दिवसांपूर्वी काही टेक्निकल कारणास्तव MPSC ची अर्ज प्रक्रिया काही दिवसांसाठी बंद करण्यात आली होती. म्हणूनच अर्ज करताना उमेदवारांनी सावधानता बाळगत संपूर्ण नोटिफिकेशन (Official Notification for MPSC Group C Exam) वाचूनच अर्ज करायचे आहेत. अर्ज करताना काहीही चूक झाल्यास किंवा फॉर्ममध्ये आढळल्यास उमेदवारांचा अर्ज नाकारला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत ज्या उमेदवारांना या पदासाठी अर्ज करायचा असेल त्यांच्याकडे फक्त काही दिवस शिल्लक आहेत. आयोगाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार औद्योगिक निरीक्षक, उपनिरीक्षक 114, तांत्रिक सहाय्यक 14, कर सहाय्यक 117, लिपिक टंकलेखक मराठी 473, लिपिक टंकलेखक इंग्रजी 79 अशा 103 पदांवर भरती केली जाणार आहे. तसंच MPSC Group C पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेच्या आधारे या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. तर, भरती प्रक्रियेशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवारांना अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. Golden Chance! उमेदवारांनो, BEL कंपनीत नोकरीची ही संधी सोडू नका; इथे करा अप्लाय असा करा अर्ज (Apply Process for MPSC Group C Exam) mpsc.gov.in वर MPSC च्या अधिकृत साइटला भेट द्या. होम पेजवर उपलब्ध ऑनलाइन अर्ज लिंकवर क्लिक करा. एक नवीन पृष्ठ उघडेल जिथे उमेदवारांना लॉगिनवर क्लिक करावे लागेल. लॉगिन तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट वर क्लिक करा. अर्ज भरा आणि अर्ज फी भरा. सबमिट वर क्लिक करा आणि पृष्ठ डाउनलोड करा. पुढील आवश्यकतेसाठी त्याची हार्ड कॉपी ठेवा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career, Jobs, Mpsc examination

    पुढील बातम्या