MPSC Exams: एमपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी

MPSC Non-Gazetted Group B Combined Preliminary Examination: महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-2020 येत्या रविवारी म्हणजेच 11 एप्रिल रोजी होणार आहे.

MPSC Non-Gazetted Group B Combined Preliminary Examination: महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-2020 येत्या रविवारी म्हणजेच 11 एप्रिल रोजी होणार आहे.

  • Share this:
    मुंबई, 7 एप्रिल: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) मार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-2020 (MPSC Non-Gazetted Group B Combined Preliminary Examination 2020) दिनांक 11 एप्रिल 2021 रोजी घेण्यात येणार आहे. परीक्षा ठरलेल्या वेळेतच घेण्यात येणार असल्याचं आयोगाने स्पष्ट केलं असून उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. राज्यात कोरोनाचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव आणि राज्य सरकारकडून लागू कऱण्यात आलेले कठोर निर्बंध यामुळे परीक्षा होणार की नाही असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होत होता. मात्र, परीक्षा होणार असल्याचं आयोगाने स्पष्ट केलं आहे. उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना परीक्षेच्या काळात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत ठेवणे अनिवार्य आहे. परीक्षेसाठी विहित परीक्षा उपकेंद्रावर परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी दीड तास अगोदर हजर राहणे अनिवार्य असून परीक्षा कक्षातील शेवटच्या प्रवेशासाठी प्रवेश प्रमाणपत्रावर विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही उमेदवाराला प्रवेश मिळणार नाही. ओळखीच्या पुराव्यासाठी स्वत:चे आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड व स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र तसेच, उमेदवाराचे छायाचित्र व इतर मजकूर सुस्पष्टपणे दिसेल अशी मूळ ओळखपत्राची छायांकित प्रत सादर करणे अनिवार्य आहे. परीक्षा कक्षात मोबाइल दूरध्वनी अथवा इतर कोणतेही दूरसंचार साधन घेऊन जाण्यास परवानगी नाही. मोठी बातमी, 9वी आणि 11 वीच्या विद्यार्थ्यांनाही सरसकट पास करणार! परीक्षा उपकेंद्राच्या आवारात मित्र, नातेवाईक अथवा पालकांना कोणत्याही परिस्थितीत प्रवेश मिळणा नाही. प्रश्नपुस्तिका, उत्तरपत्रिका तसेच प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या सर्व सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन पालन करणे आवश्यक आहे. Covid-19 विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या सूचनांचे तसेच स्थानिक प्राधिकरणाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांचे पालन करणे अनिवार्य आहे. उत्तरपत्रिकेवर परीक्षेचे नाव, बैठक क्रमांक, संच क्रमांक, विषय संकेतांक इत्यादी तपशील योग्य प्रकारे नमूद करावा. परीक्षा कालावधीत कोणत्याही प्रकारे गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आढळून आल्यास अथवा आयोगाच्या कोणत्याही सूचनांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार प्रतिरोधनाची कारवाई करण्यात येईल.
    Published by:Sunil Desale
    First published: