MPSC Pre Exam Answer Key : प्रीलिम्सची उत्तरपत्रिका आली समोर, इथे करा चेक

MPSC Pre Exam Answer Key : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 21 मार्च रोजी झालेल्या पूर्वपरीक्षेची उत्तरपत्रिका जारी केली आहे.

MPSC Pre Exam Answer Key : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 21 मार्च रोजी झालेल्या पूर्वपरीक्षेची उत्तरपत्रिका जारी केली आहे.

 • Share this:
  मुंबई, 25 मार्च :  महाराष्ट्र लोक सेवा आयोगाने (MPSC) पूर्वपरीक्षा-2021  ची उत्तर पत्रिका (MPSC Answer Key 2021) जारी केली आहे. विद्यार्थी एमपीएससीच्या वेबसाइटवर mpsc.gov.in वर ही उत्तर पत्रिका पाहू शकतात. राज्यसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा (MPSC Prelims answer key) परीक्षा 21 मार्चला घेण्यात आली होती. आयोगाच्या नोटिफीकेशन नुसार ही परीक्षा महाराष्ट्र सब ऑर्डिनेट सर्विसेसच्या 806 रिक्त पदांसाठीच्या भरतीसाठी होत आहे. यात 475 पोलिस सब इन्स्पेक्टर साठी, 52 असिस्टंट सिलेक्शन ऑफिसर साठी आणि 64 पदे राज्य टँक्स इन्स्पेक्टर च्या पोस्ट साठी आहेत. अशा प्रकारे Answer key पाहू शकता
  • सर्वात आधी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची वेबसाइट mpsc.gov.in वर जा.
  • यानंतर होम पेज वर ‘State Services Preliminary Examination - 2020 - Paper-1 - Answer key’ and ‘State Services Preliminary Examination - 2020 - Paper-2 - Answer key’ given under ‘Latest Updates’ लिंक वर क्लिक करा
  • Answer key ची पीडीएफ फाइल ओपन होईल
  • या फाइल ला डाउनलोड करा
  • उत्तरं चेक करा आणि जर कोणतही उत्तर चुकीचं असेल तर ऑब्जेक्शन सबमिट करा
  • आता Answer key चे प्रिंट आउट काढा
  मुख्य परीक्षेचं स्वरूप प्रारंभिक परीक्षेत पास झालेले विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी पात्र होतील. यात सहा पेपर अनिवार्य असतात. पेपर-01 आणि पेपर-02  भाषा चे असतात. तर पेपर-03, पेपर-04, पेपर-05 आणि पेपर 06 जनरल स्टडीज चे असतात. एमपीएससी च्या मुख्य परीक्षेत कोणतेही वैकल्पिक विषय नसतात. आणखी एका राज्यात आरक्षणाबाबत मोठा निर्णय; 75 टक्के नोकऱ्या फक्त भूमिपुत्रांना मराठी आणि इंग्रजी (निबंध आणि अनुवाद, ग्रामर/कॉंप्रिहेंशन) चे पेपर 100-100 गुणांचे असतात. भाषेच्या पहिल्या पेपर ला  तीन तासांचा वेळ मिळतो तर दूसऱ्या पेपर साठी एक तास मिळतो. बाकी सगळे पेपर 150-150 गुणांचे असतात. प्रत्येक पेपर सोडवण्यासाठी 2 तासांचा वेळ मिळतो.  पहिला पेपर डिस्क्रिप्टिव (descriptive) असतो. तर बाकी सर्व पेपर बहूपर्यायी (multiple choice question) असतात.
  Published by:News18 Desk
  First published: