मराठी बातम्या /बातम्या /करिअर /बोर्डाच्या परीक्षेत स्कॉलर्स पण ओढ मात्र Arts कडे; बहुतांश विद्यार्थी Science ला का म्हणताहेत NO? ही असू शकतात कारणं

बोर्डाच्या परीक्षेत स्कॉलर्स पण ओढ मात्र Arts कडे; बहुतांश विद्यार्थी Science ला का म्हणताहेत NO? ही असू शकतात कारणं

स्कॉलर्स पण ओढ  Arts कडे

स्कॉलर्स पण ओढ Arts कडे

अचानक स्कॉलर विद्यार्थ्यांचा कल आर्ट्स कडे आहे. पण असं का होतंय? विद्यार्थ्यांचं मन बदललं? की विद्यार्थ्यांना सायन्सचा कंटाळा आला? नक्की काय यामागचं कारण?

मुंबई, 03 ऑगस्ट: बोर्डाच्या परीक्षा यंदा नेहमीप्रमाणे ऑफलाईन पद्धतीनं आटोपल्या. यानंतर वेळेत परीक्षांचे निकालही जाहीर करण्यात आलेत. गेल्या वेळेपेक्षा काहीसे कमी मात्र निकाल ठरले. यानंतर सुरू झाली ती अकरावी प्रवेशाची चुरस. अनेक दिवस CBSE चे निकाल न लागल्यामुळे विद्यार्थ्यांना बरेच दोवास वाट बघावी लागली. मात्र आता अकरावीच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरु झाली आहे. पुण्यात आज प्रवेशाची पहिली कट ऑफ लिस्ट जारी करण्यात. मात्र या कट ऑफ लिस्टमध्ये काहीशी चकित करणारी गोष्ट दिसून आली आहे.

सायन्स, आर्ट्स आणि कॉमर्स या स्ट्रीममध्ये प्रवेश घेण्यासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं. त्यानुसार आता पुण्यातील काही कॉलेजेस आणि स्ट्रीम्स यांची कट ऑफ लिस्ट जारी करण्यात आली आहे. मात्र यामध्ये नेहमीपेक्षा विपरीत घडताना दिसून येतंय. सायन्सकडे राहणारा विद्यार्थ्यांचा कल अचानक आर्ट्स कडे वळू (Why students are saying No to science field) लागला आहे.

11th Admissions: प्रवेशासाठी पुणे विभागाची पहिली Cut Off लिस्ट जारी; कोणत्या कॉलेजचा किती कट ऑफ? इथे मिळेल माहिती

नेहमी अधिक मार्क्स असणारे विद्यार्थी किंवा स्कॉलर विद्यार्थी हे सायन्सकडे जाण्यासाठी इच्छुक असतात. मात्र यंदा तसं होताना दिसून येत नाहीये. अचानक स्कॉलर विद्यार्थ्यांचा कल आर्ट्स कडे आहे. पण असं का होतंय? विद्यार्थ्यांचं मन बदललं? की विद्यार्थ्यांना सायन्सचा कंटाळा आला? नक्की काय यामागचं कारण?

ही असू शकतात संभाव्य कारणं

विद्यार्थ्यांचा कल आर्ट्स कडे असण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे स्पर्धा परीक्षांकडे वाढत असणारा कल. देशातील लाखो विद्यार्थी सध्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. आर्ट्समधून शिक्षण घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना बराच वेळ हा या परीक्षांची तयारी करण्यात घालवता येतो. तसंच आर्ट्समध्ये शिक्षण घेणंही सोपी आहे. त्यामुळे सरकारी नोकरी मिळण्याचे अधिक चान्सेस असू शकतात असं विद्यार्थ्यांना वाटत असावं. म्हणून आर्टस् विद्यार्थ्यांची पसंती ठरत आहे.

दुसरं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे सायन्समध्ये शिक्षण घेतल्यानंतर इंजिनिअरिंग किंवा मेडिकल आणि इतर काही बोटावर मोजण्याइतकी फिल्ड्स सोडलीत तर करिअरसाठी खूप कमी मार्ग आहेत. त्यात पुढे बारावीनंतर इच्छा आणि आवड बदलली तर फिल्ड बदलू शकणार नाही म्हणून विद्यार्थी आर्टस् चा मार्ग निवडत असावेत.

तिसरं कारण म्हणजे आर्थिक परिस्थिती. असे अनेक विद्यार्थी असतात जे स्कॉलर असतात मात्र आर्थिक परिस्थिती बेताची असते. अशा विद्यर्थ्यांना सायन्समध्ये शिक्षण घेणं परवडणारं नसतं. इंजिनिअरिंग किंवा इतर क्षेत्रातील कॉलेजची फि अवाढ्यव्य अस्नल्यामुळे त्यांना इच्छा असूनही त्यांना आर्ट्समध्ये प्रवेश घ्यावा लागतो.

CAT 2022: परीक्षेसाठी आजपासून सुरू झाली नोंदणी प्रक्रिया; रजिस्ट्रेशन करण्याआधी 'या' IMP गोष्टी वाचाच

या सर्वांहून आवश्यक आणि महत्त्वाचं कारण म्हणजे सायन्स क्षेत्रातील कमी होत चाललेल्या नोकऱ्या. सायन्समध्ये शिक्षण होऊन पदवी प्राप्त करूनही नोकरी नाही असे अनेकजण आहेत. टेक्नॉलॉजी कितीही पुढे जात असली तरी सायन्स क्षेत्रात पदवीनंतर नोकरीला कमी झाल्या आहेत हे सत्य आहे. अनेक तरुण बेरोजगार आहेत. त्या तुलनेने आर्ट्सक्षेत्रात खूप पर्याय उपलब्ध असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना नोकरी मिळू शकते. म्हणूनही आर्टस् कडे विद्यार्थ्यांचा अधिक कल असण्याची शक्यता आहे.

First published:

Tags: Career, Career opportunities, Education, Explainer