मुंबई, 07, जून: महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावीचा निकाल काही दिवसांआधी जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी आता अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही ही अर्ज प्रक्रिया दोन विभागांमध्ये घेण्यात आली होती. यामध्ये निकालाआधीच पहिला टप्पा सुरु करण्यात आला होता. तर अर्ज प्रक्रियेचा दुसरा टप्पा निकालांनंतर सुरु झाला आहे. आता अकरावीच्या पहिल्या गुणवत्ता यादीबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पण ज्या विद्यार्थ्यांना अजूनही अकरावीमध्ये प्रवेशाबाबत कोणताही संभ्रम आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी खूशखबर आली आहे. मुंबई महानगरातील 1017 उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये 11वीच्या ऑनलाइन प्रवेशाला सुरुवात झाली आहे. या तीन लाख 78 हजार जागांवरील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना उद्या, 8 जुन पसंतीक्रम भरता येणार आहे. अर्ज भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी शिक्षण विभागाने जय्यत तयारी केली असून, विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत विद्याथ्यांच्या मदतीसाठी 48 मार्गदर्शन केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. Army Success Story: ‘वर येऊ नका, मी यांना बघून घेईन’; 26/11च्या वेळी दहशतवाद्यांचा खात्मा करणारा योद्धा; कोण होते मेजर संदीप उन्नीकृष्णन विद्यार्थ्यांना आता कनिष्ठ महाविद्यालयीन प्रवेशाचे वेध लागले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी इयत्ता अकरावीची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया निकालाआधीच सूरू करण्यात आली आहे. ऑनलाइन पद्धतीने पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक आणि अमरावती या शिक्षण विभागात ही ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. कोणत्या शाखेला किती जागा मुंबई महानगर क्षेत्रात 11वीच्या प्रवेशासाठी गेल्यावर्षी तीन लाख 73 हजार जागा होत्या. यंदा त्यांमध्ये चार हजार 320 जागांची वाढ झाली. आहे. याअंतर्गत यावेळी आर्ट्स शाखेला 49 हजार 390 जागा, वाणिज्य शाखेला दोन लाख 2 हजार 240, विज्ञान शाखेला एक लाख 21 हजार 520 जागा, तर एचएसव्हीसी अभ्यासक्रमाला पाच हजार पाच जागा उपलब्ध आहेत. 11th Admission Process: मोठी बातमी! ‘या’ तारखेला जाहीर होणार अकरावी प्रवेश प्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी या वेबसाईटवर मिळेल मार्गदर्शन केंद्रांबाबत माहिती https://mumbai.11thadmission.org.in/Public/Home.aspx या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना प्रवेशाबाबत आणि मार्गदर्शन केंद्राबाबत माहिती देण्यात आली आहे. तसंच प्रवेशाबाबत संपूर्ण ऑनलाईन प्रोसेस याच वेबसाईटवर करायची आहे. हे सुविधा मुंबईतील उमेदवारांसाठी असणार आहे. या प्रक्रियेअंतर्गत प्रवेशाचा पहिला भाग भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यानंतर महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरण्यासाठी 08 ते 12 जून, अशी मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर पहिली गुणवत्ता यादी 19 जून रोजी जाहीर होणार आहे, असे शिक्षण संचालनालयाच्या वतीने कळवण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.